सखे ग !
सखे ग...!
जपून जा तुझ्या मार्गावर ...
कोणी नाही दिसले तरी
वाट नको सोडू तू ...
सोबत कोणी नसले तरी
वाट नको बदलू तू....
कोणी तरी असेल पुढे तुझ्या
कोणीतरी असेल मागे तुझ्या ...
कोणासाठी असशील तू एक
नवीन प्रवासी ..
तर कोणासाठी असशील तू
एक धाडसी प्रवासी ...
सखे ग....
असतील अनेक मार्ग तुझ्यासमोर
मन घाबरून, गोंधळून जाईल
गेलीस कुठे ही तरी एक
अनुभवाचा स्थानक बघून येशील !
सखे ग...
प्रत्येकच मार्ग नसेल
ओळखीचा, आवडीचा ...
वाट धरुनच असेल मार्ग
दुःखाचा आणि संकटाचा ...
सखे ग ..
कर ते खडतर मार्ग पार
आत्मविश्वासच्या गाडीने ....
नसेल कोणी चालक सोबती
तरी हारून जाऊ नको
शत्रूच्या भीतीने ....
सखे ग...
शेवटी तूच आहेस
तुझा मार्ग ,
तूच आहेस तुझी गाडी...
तूच आहेस तुझा चालक
तूच आहेस तुझे स्थानक....