पुन्हा तिथेच गवसणार कदाचित
आपण पुन्हा हरवणार कदाचित
जिची भेट प्रार्थनीय होती मजला
तिला दुसराच भेटणार कदाचित
आठवून पण आता काय होणार
म्हणून तुला विसरणार कदाचित
हे अनोळखी धुके हटतील बहुदा
तू मजला ओळखणार कदाचित
आयुष्यभर रडवेल आयुष्य मला
तुला भनक हि नसणार कदाचित
दुरावलेले का कधी भेटलेत पुन्हा
तू माझी वाट पाहणार कदाचित