Marathi Quote in Poem by Aditya Dhole

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

गरीब काय करणार......?

अंधारलेल्या जगात कधी नवी पहाट होणार,
दिसत नाही म्हनून कोण कोणाची साथ देणार.

आस आहे त्या दिवसाची,
जेव्हा कोरोना जगातून संपेल.
गरज आहे फक्त साथेची आणि धीराची,
पण ती देण्यासाठी कोण जवळ नसेल.

श्रीमंत हा इलाज करणार,
गरीब मात्र काय करणार.
तो फक्त भीक मागणार,
आणि वाट बघणार नव्या पहाटेची.

मदतीच्या हाताची गरज आहे,
पण ती देणार कोण?.
जो तो फक्त आपलं बघतो,
मग आम्हास पाणी पाजनार कोण?.

स्वप्न गरिबांचे स्वप्नच राहणार,
त्याची जळून राख होणार.
तो फक्त दोन घास बघणार,
शेवटी तो तिथेच निजनार.

आदित्य ढोले.

Marathi Poem by Aditya Dhole : 111765883
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now