ती.दोन पिढीच्या परस्परांमधील घुसमटीमुळे आज मानसिकतेचे आजार वाढत चालले आहेत आनंद कुठेतरी हरवल्यासारखा भासतो,नाटकातील कलाकार पडद्यावर जसे वावरतात तसेच नाटकी पडदा खऱ्या आयुष्यात या लोकांनी एकमेकांशी वर्तन करताना ओढून घेतलाय.आजच्या तरुण पिढीला संस्कार,आदर,रूढी,परंपरा या बंधनांमध्ये स्वतःला गुंतवून घ्यायचे नाही.प्रत्येक क्षणाचा आनंद लुटायचा ,साजरा करायचा ,बिनधास्त राहायच स्वतःला कमी न लेखता प्रत्येक गोष्टीकडे आशादायी स्वरूपामध्ये पाहत हि पिढी स्वतःचे आयुष्य जगू पाहत आहे,काहीतरी धडपड करू पाहते,त्यांनी आयुष्याला आपल्या तालावर नाचवायचे ठरवले,स्वतःचे भविष्य स्वतःच घडवायचे,माझे नशीब मीच ठरवणार असे ब्रीदवाक्य त्यांनी आयुष्य जगताना बनवून घेतलंय.पण नेमकं या उलट याच पिढीचे आई-बाबा ,आजी-आजोबा एका वेगळ्याच ट्रेंड मध्ये वावरलेले,मोठे झालेले,संस्कृतीच्या झोपाळ्यात झुलत झुलत त्यांनी आयुष्याची दोरी सांभाळली त्याच लयबद्ध अशाच पद्धतीने जीवनक्रम करायचे,एवढंच ते त्यांच्या आयुष्यात शिकले,त्यामुळे नवीन पिढीची नवीन तत्वे,जीवन जगण्याचा नवा मार्ग या लोकांना त्यांचा आगाऊपणा वाटते.त्यांच्या मते अशा पिढीमुळेच देशाला मागे येण्याचा रस्ता पाहायला मिळणार आहे; कसा देश प्रगती करणार?कि हि बदलती दुनिया मिळवलेले सर्व काही भस्मसात तर नाही न करणार?आजच्या पिढीला कमी कष्टात अधिक पैसे,बैलाचं काम न करता डोक्याचं काम करायचं आणि पैसे मिळवायचा,मोठं बनायचं पण याउलट अगोदरची पिढी समाधानात राहायचं,धोका न पत्करता शांतपणे इतरांना त्रास न देता चाकोरीबद्ध जीवनाची लय सांभाळायची असे त्यांचे मत.खरं तर अशा दोन टोकांच्या मतांच्या लोकांनी एकत्र राहणं यामुळे मानसिकतेवर मोठा परिणाम होतो. या दोन वेगळ्या विचारांचा मेळ बसणे खरोखरच फारच अवघड आहे, तरीपण कुठंतरी या दोन्ही भिन्न विचारांचा मध्य गाठणे आणि त्याप्रमाणे यांनी एकमेकांना समजून घेऊन काळाची, परिस्थितीची जाणीव ठेवून जर समाजात प्रत्येकाचे वर्तन झाले,तर नक्कीच प्रगतीचा मार्ग आपणाला गवसेल नाहीतर आपण आपल्यातच भांडत बसणार. आपण आपल्या विकासाचा मार्ग स्वतःच शोधला पाहिजे,म्हणूनच म्हणावेसे वाटते,कि "तूच आहेस देशाच्या विकासाचा शिल्पकार" पाहूया तर मग आता कोण कोणाला किती आणि कसे समूजन घेणार आहेत?