यथा चतुर्भिः कनकं परीक्ष्यते निघर्षणच्छेदनतापताडनैः।
तथा चतुर्भिः पुरुषः परीक्ष्यते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा।।
सरलार्थ...
ज्याप्रमाणे कसोटीच्या दगडावर जोरात घासण्याने,
कापण्याने, तापण्याने , ठोकण्याने अशा चार प्रकारे सोने पारखले जाते ,त्याप्रमाणे शिक्षण,चारित्र्य ,सद्गुण आणि कार्य या चार गोष्टींनी माणसाची पारख केली जाते.