#ठेवा
डोंगर दऱ्या निसर्ग हिरवा
कडाक्याचं ऊन कोठे तर
कोठे आल्हाददायक गारवा
खळखळत्या नद्या नाले
धबधबा गातोय मारवा
भूमी विविधतेने नटलेली
इथे मिळतो छान रानमेवा
विविधेतही नांदते एकता
लाभलाय अनमोल ठेवा
सोडून देऊ सारे भेदाभेद
संस्कार रुजवू हा नवा
.....प्रल्हाद दुधाळ 9423012020