Marathi Quote in Good Morning by Aaryaa Joshi

Good Morning quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

ज्योतीने ज्योत लावूया#

अनुभवलय ना कधीतरी...
मनात काहुर माजवणार्‍या तीनसांजेला
देवापुढे आजीने लावलेलं नीराजन
त्या ज्योतीत उजळलेला तिचा स्निग्ध चेहरा....
अनुभवलय ना...
कुठल्याशा गड किल्ल्यावर उतरणारी संध्याकाळ...
मनातली हुरहुर अनुभवत सोबत्याचा घट्ट हात धरून बुरूज,माची फिरताना...आणि त्यावेळी खोर्‍यातल्या दूरच्या अज्ञात घराच्या अंगणी तुळशीवृंदावनापुढे लावलेल्या दिव्याची ज्योत
त्या बोचर्‍या वार्‍यात किती लांबून उब देते...
तीच उब तीच स्निग्धता... आज देऊया...
ज्योतीने ज्योत उजळवूया....

Marathi Good Morning by Aaryaa Joshi : 111386181
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now