सध्याच्या परिस्थितीवर आधारित अशी कविता#
*शाळा असो वा उद्योगधंदे..*
*अहो वाहतूक सुद्धा झाली ठप्प,*
*एका छोट्याश्या या विषाणु समोर..*
*बरेच देश का हो झाले गप्प#*
*कारण आहे एकच..*
*अस्वच्छता आणि निष्काळजीपणा*
*निसर्गाच्या समोर टिकत नाही..*
*जास्तीचा हा शहाणपणा#*
*पसरता कोरोना जगभर..*
*शिकवून जातो बरच काही,*
*भेदभाव, जातीयता, दंगल सारख्या गोष्टींना..*
*हा थाराही देत नाही#*
*थोडेसे झालोत ओ हतबल..*
*कारण सावट आहे एका रोगाचे,*
*परंतू घाबरून न जाता..*
*धाडस करा एकजुटीने लढण्याचे#*
*या महामारीच्या संकटातून..*
*सुटका सर्वांची होऊ दे,*
*आणि स्वच्छतेचे महत्व..*
*आतातरी सर्वांना कळु दे#*
🇮🇳 *स्वच्छ भारत.. सुंदर भारत*🇮🇳
#बरोबर