भारतीय नदी दिवस शुभेच्छा
तुझ्याच काठी वसली संस्कृती
जनामनात तुझी ख्याती!
कधी होतेस गंभीर थोडी
अवखळ कधी कधी वेडी
आमुची तू जीवनवाहिनी
विहरतेस तू गिरी-काननी
तुझ्या कृपेने शेती फुलते
जीवन फुलून उमलून येते
भरली जाते तुझी ओटी
दीप दान तुझ्याच तटी
मांगल्याची अन स्नेहाची
कथा ही सुंदर अमुच्या नदीची