कधीतरी असंही जगून बघा...
एखाद्यावर हास्यास्पद विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार तर करून बघा
काय वाटेल त्याला? आणि
कसे वाटेल त्याला?
त्याच्या दृढ निश्चयाची
विल्हेवाट लावली तेव्हा....
कधीतरी असंही विचार करून बघा....
स्वतःच्या समाधानासाठी
दुसऱ्याला खाली पाडून
जगण्यात कसला अर्थ आला?
कधीतरी दुसऱ्यासाठी स्वतःला समर्पित करा।
कधीतरी असंही जगून पाहा...
मला जास्त येतंय
त्याला कमी येतंय
हे पहिलेच गृहीत धरू नका
त्याला ठामपणे उभे राहण्यासाठी
एक संधी तरी देऊन पाहा..
ती काळी, ही गोरी
कुणाच्या दिसण्यावर जाऊ नका
प्रत्येकाचं मनाचं वाचन करा
दिसतं तस नसतं
कधीतरी असंही समजून जगा ....
कधी कोणाच्या भल्यासाठी, समाधानासाठी
कधी न केलेलं काम करून तर बघा
जीवनाचा खरा आनंद हाच आहे
कधीतरी असंही जगून बघा......
©दिपकरिंगे ✍