एका शांत तळ्याकाठी
विसरुनी जग सारे
मी अनुभविता स्वतः ला
आत्म्याचा आनंद पाझरे!
शोध माझा संपतो
अन भेटते मी स्वतः ला
कधीतरी वेळ द्यावा
स्वतः स्वतः शी बोलायला!
स्वत्वाचे प्रतिबिंब
पडते माझ्या अंतरात
अन तळ्यातले निर्मळ जळ
सामावते माझ्या डोळ्यात!
घडते ही किमया
सारे आकळते
देहाच्या पलीकडचे
रहस्य मला उलगडते!