साल २००५,वेळ सकाळी ११,नागरीसुविधा केंद्रामध्ये जातीच्या दाखल्यावर अधिकाऱ्याची सही घेताना,त्याने ३० रु मागितले.मी आधीच २५ रु चे चलन भरले म्हटल्यावर थोड्यावेळाने ये म्हणाला.बाकीचे मुकाट्याने पैसे देऊन सही करून घेत होते.एका तासाने पुन्हा गेलो.पुन्हा पैसे मागितले.मी नकार दिला तर माझ्याकडे रागाने बघत म्हणाला,"आता जेवायची वेळ झाली आहे.नंतर ये."
पुन्हा एका तासाने गेलो.तो,"पैसे?"
"साहेब,मी आधीच भरलेत पैसे." बाकीचे पैसे देत होते सह्या होत होत्या.मी ऑफिसच्या दारातच उभा.त्याचं लक्ष माझ्याकडे जात होतं.ऑफिस संपायची वेळ,पाच वाजले.जेव्हा ते जाण्यासाठी आवरायला लागले,पुन्हा अर्ज घेऊन गेलो."साहेब सही?"
"चल.दे इकडं.परत येऊ नको माझ्याकडं सही मागायला." खिडकीवर फॉर्म भरायची वेळ संपली होती.पण,३० रु वाचवले याचा आनंद खूप मोठा होता.