Marathi Quote in Poem by Mahesh Suryavanshi

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

---- मृत्यू ----

सजवत होते मला
मी शांत निजलो होतो,
बहुतेक आसवांच्या धारेनं
मी चिंब भिजलो होतो....

शेवटची आंघोळ ती
होती गरम पाण्याची.....
ज्याला त्याला घाई
मला डोळे भरून पाहण्याची..

ज्यांच्या खांद्यावर माझं
गेलं होत बालपण.....
त्यांनीच पुन्हा उचलून
घेतलं आज पण........

जवळचे सारे होते
होतं कुणीतरी परकं......
'न्हेऊ नका' मोठ्यानं
म्हणत होतं सारखं...........

आज वेगळंच
काहीतरी घडत होतं......
वैऱ्याचं ही प्रेम
माझ्यावर पडत होतं..........

'तिथपर्यंत' नेऊन सुद्धा
माझ्यावर प्रेम लुटवत होते.....
जोरजोरात रडून
सगळे मला उठवत होते........

अजून चार लाकडं द्या
म्हणजे तेवढ्यात भागेल......
माझ्याच कुणीतरी विचारलं
'अजून किती वेळ लागेल'.....

सरणावर झोपूनही
मी मौन पाळलं होतं.....
जिव लावणाऱ्या माझ्यांनीच
मला जाळंल होतं..........!
MS

Marathi Poem by Mahesh Suryavanshi : 111260285
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now