#Kavyotsav2
तू....
कधी चंद्रात दिसलास तू,
कधी दवांत भिजलास तू....
कधी लुकलुकत्या तारकांत तू,
कधी गवताची पात तू...
कधी भिरभिरणाऱ्या माझ्या नजरेत,
कधी थरथरत्या शब्दांत तू....
कधी कंपणांच्या स्पर्धेत,
कधी भावनांच्या अर्थात तू....
कधी भासलास मृद्गंधात,
कधी इंद्रधनुच्या सप्तरंगात तू...
कधी गुलाबांच्या रंगात,
कधी चाफ्याच्या गंधात तू....
कधी कल्पनेच्या डोहात,
कधी निरर्थक विचारांत ही तू...
कधी शब्दारूपी भावनांत,
कधी वेड्या स्वप्नांत तू.....
त्या रातकिड्यांची किर्रर्र तू,
तूच बरसातती श्रावणसर....
तुझ्याच आठवणीत वेड्या,
मी जागी रात्रभर.....
मी गायलेले गीत तू,
ताल तू, तूच सुर....
दे आयुष्याची साथ तू,
जाऊ नकोस असा दूर....
तू जाऊ नकोस असा दूर......
सुविधा......?