हैशटॅग # KAVYOTSAV -२
विषय -प्रेम
१) प्रेम दिसत नसते
काळजात लपत नसते
त्याची परीक्षा नसते
ते निरंतर वाहत असते
प्रेमाला शब्दांची नसे भाषा
त्याची उत्तुंग आशा
ती धुंद करणारी नशा
चिरंतर तरुणाईची दशा
नाही त्याला बंधन
देवाघरचे ते चंदन
झिजून गेलेले सहाण
तरी भागात नाही तहान
प्रेमाचा प्रेमळ पुकारा
पुरवतो मनाला सहारा
रात्रंदिवस स्तब्ध पहारा
हास्यमय दिसे नजरा
प्रेम असे पवित्र
पावतीची काय गरज
प्रेमाने जिंकते जग
त्यावरच सृष्टीचा तग