Marathi Quote in Story by suvarna jadhav

Story quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

योग्य दिशा

राहुल एक अतिशय प्रामाणिक ,कष्टाळू , गरीब परिस्थितीत वाढलेला मुलगा . राहुल आई वडिलांचा एकुलता एक मुलगा. मुलगा चांगला शिकावा आणि शिकून त्यान कोणीतरी मोठ व्हावं अस त्यांना वाटायच म्हणून केवळ नशिबाला दोष न देता सतत काम करत राहायचे आणि राहुलला शिक्षणासाठी काही कमी पडू नये याची काळजी घ्यायचे . आई त्यासाठी पाच घरची धुणीभांडी करायची,तर दोन घरी पोळ्या करायला जायची. तर वडील जीथ बांधकाम असेल तिथ गवंडी काम करायचे .ते ही खूप मेहनती असल्याने कंत्राटदार त्यांच्या कामावर ,वागण्यावर खुश असे .त्यामुळे त्यांना दरवेळी कामाला बोलवत असे. कुठल ना कुठल काम देत असे .त्यामुळे त्यांना शक्यतो रिकामपण नसे. आई -वडील मुलाच्या शिक्षणासाठी मनापासून कष्ट उपसत होते .
राहुलला आई वडिलांच्या कष्टाची जाणीव होती .अर्जुनाला जसा केवळ पोपटाचा डोळाच दिसत होता,त्याप्रमाणे राहुलला केवळ आणि केवळ स्पर्धा परिक्षाच दिसत होत्या. त्यान त्याच ध्येय ठरवलं होत ..सतत ची मेहनत ,आई वडीलांचे आशीर्वाद ,त्यांचा पाठिंबा ,महाविद्यालयातील सरांचे मार्गदर्शन यामुळे त्याला यश मिळालं . उपजिल्हाधिकारी पदावर रुजू होण्याचे आदेश ही त्याला मिळाले ,,,
राहुल रुजू झाला ,त्याला शासकीय निवास्थान ही मिळाले .घर ताब्यात घेतले. .मित्रपरिवार ही पुजा घाल ,सगळ्या दिशा नीट पहा ,त्याप्रमाणे घर लाव,योग्य दिशा नाही पाहयल्या तर आयुष्याची दशा होते .राहुलला हसायलाच आल.तो म्हणाला माझ्या दृष्टीने या दिशा अजिबात महत्वाच्या नाहीत .माझ्या दृष्टीने विचारांची योग्य दिशा महत्वाची .ती तर मला आई वडील आणि गुरुजनांमुळे आधीच मिळाली . म्हणूनच माझ आयुष्य बदललं .माझा पूर्व .पश्चिम,चांगल्या इतर दिशा वाईट या वर विश्वास नाही .तुम्ही ही तुमची दृष्टी बदला ..म्हणतात ना
नजरे बदली तो नजारे बदल गये ,
कश्ति ने बदला रुख तो किनारे बदल गये ...त्यामुळे विचार बदला नशीब बदलेल. चला आता .मला आईवडिलांना आणाय..ला जायचं आहे
********************************************************
सुवर्णा अशोक जाधव
महालक्ष्मी पूर्व मुंबई 400011
Email-goldanj@gmail.com

Marathi Story by suvarna jadhav : 111137421
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now