आठवणींचं काहूर,माझ्या मनात!
जीवघेणे उसासे, तुझ्या श्वासात!!
सांगता येत नाही ,सांभाळता येत नाही!
मनाच्या आवर्ताँना ,बांधता येत नाही.
भेटण्याची आस, खोटी का खरी?
जे माझ्या मनात तेच, झुलतं का तुझ्या उरी?
कसं सांगू सख्या तुला, नाही कळत मला!
माझ्या अंतरंगात झुले, तुझाच झूला!!
हृदयातलं गाणं, गाणार आपण कधी?
का अशीच कोमेजून जाणार, तुझी माझी प्रीती?
दिक्कालांच्या पलीकडे असलेलं, नातं तुझं माझं
तरीही का वाटावं, या बंधाचं ओझं???
सरुन जातील संध्या, सरुन जातील दिवस
मात्र मनाच्या गाभार्यात बरसेल तुझ्याच आठवणींचा पाऊस!!
आर्या