जीवनाच्या वाटेत कळत- नकळत घडलेली चूक,
मनाला घाव देऊन जाते......
स्वतः कितीही विसरावं, तर
इतरांच्या मनात घर करून जाते.....
कुणाला दोष द्यायचा, की
आपणच दोषी ठरायचं....
मान्य केलेली चुक सुधारण्यापुर्वीच,
आयुष्य काट्यांनी भरून जाते....
आणि उभं आयुष्य विस्कटून जाते.....