#श्रावण
श्रावण महिना म्हणजे विविध धार्मिक व्रत वैकल्याचा महिना
या महिन्यात यानंतर येणाऱ्या भाद्रपद आणि दिवाळी काळात सुद्धा
नेवेद्याच्या जेवणाच्या सात्विक आणि साग्र संगीत पंगती सतत घडत असतात
चटण्या कोशिंबिरी या पानात म्हत्वाची भुमिका निभावतात
अशीच एक
🥕गाजराची पचडी किंवा कोशिंबीर
🥕साहित्य
दोन गाजरे
अर्धी वाटी भिजवलेली मूग डाळ
मोहरी, हिंग, हळद,तीळ,कढीलिंब, मिरचीचे तुकडे
कोथिंबीर
मोठा चमचा दाण्याचे कुट
चवी प्रमाणे साखर मीठ
लिंबू
🥕कृती
गाजरे कीसून घ्यावी
त्यात भिजवलेली मूग डाळ घालावी
मोहरी, हिंग, हळद,तीळ,कढीलिंब, मिरचीचे तुकडे याची फोडणी द्यावी
🥕बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी
मोठा चमचा दाण्याचे कुट
चवी प्रमाणे साखर मीठ घालून लिंबू पिळावे
🥕यात दही घालायचे असेल तर लिंबू पिळायची गरज नाही