विजयाची होळी पेटवली!!
एक वाऱ्याची झुळूक आली,
माझ्या अधोगतीची गाथा रंगली.
प्रबळ इच्छाशक्ती माझी मरण
पावली,
जणु दिव्याची ज्योत चोरली.
आयुष्याने कैसे खेळ मांडले, सळसळते रक्त थंड पाडले.
जणु माझ्यातले चैतन्य हरवले,
कोण माझ्यातले मकरंद चोरले.
ऐसे कैसे मन भरकटले,
जेणे सप्तरंगी स्वप्न जळाले.
जणु माझ्यातले संगीत हरवले,
कोण माझ्यातले स्वर चोरले.
एका शुद्र वादळाने विझवले,
ऐसे माझे कर्तुत्व जाहले.
जणु माझ्यातले तेज हरवले,
कोण माझे सुगंध चोरले.
जबाबदाऱ्यांपासून माझे देह पळाले,
जणु माझ्यातले कर्तव्य हरवले, कोण माझे उत्साह चोरले.
फक्त लाचारी उरली,
कष्टाची उधारी वाढली.
इथेच ही अधोगतीची गाथा संपली.
इंद्रधनुच्या सप्तरंगानी मी पुन्हा स्वप्ने फुलवली,
कष्टाने वाट सजवली,
चुकांनी दिशा दाखवली,
माझी झेप उंचावली,
व विजयाची होळी पेटवली.