घरच्या कैरीचे लोणचे
तिसरी फेरी 😋
घरच्या झाडाच्या कैऱ्या आता बाळसे धरू लागल्या आहेत
आंबे आढीत घालेपर्यंत तीन ते चार वेळा तरी लोणचे होतेच तर असतेच
घरी खायला जरी केलेले असले तरी
कधी मित्र मैत्रिणींना
कधी नातेवाईकांना
कधी नमुना म्हणून शेजारी पाजारी
असे वाटप चालुच असते
काल लोणच्यासाठी चार कैऱ्या काढल्या
आधी देवापुढे ठेवल्या
नंतर चिरून बघितले आत कोय तयार होत होती
घरची ताजी करकरीत कैरी
एका कैरीला...
एक मोठा चमचा बेडेकर लोणचे मसाला
एक मोठा चमचा मोहरीची डाळ
एक छोटा चमचा तिखट
एक छोटा चमचा हिंग
एक छोटा चमचा हळद
एक छोटा चमचा मेथी पावडर
एक मोठा चमचा मीठ
यावर...
मोहरी आणि हिंगाची खमंग फोडणी
चविष्ट चमचमीत लोणचे तयार झाले