🟢कैरी 🧅कांदा चटणी
🟢 साहित्य
एक मध्यम कैरी
एक मध्यम कांदा
साखर दोन चमचे
एक मिरची बारीक चिरून
एक चमचा तिखट
मीठ चवीनुसर
अर्धा चमचा जिरे
मोहरी आणि हिंगाची फोडणी
🟢कृती
कैरी साल काढून किसून घ्यावी
कांदा कीसून घ्यावा
कैरी कांदा कीस,थोडे जिरे साखर, मीठ हे सर्व एकत्रित करून घ्यावे
मोहरी हिंग फोडणी करुन त्यात एक चमचा तिखट घालावे
व लगेच ती फोडणी कीसावर ओतावी
परत हे सगळे मिश्रण हलवुन घ्यावें
🟢बारीक मिरची व तिखट दोन्हींमुळे एक वेगळा स्वाद या चटणीला येतो