रंगपंचमी
#हटके_गोड_पदार्थ
⭐चंपाकली
चंपाकली म्हणजे चंपाकळीच्या( चाफ्याच्या फुलाच्या) आकाराची गोड किंवा खारी शंकरपाळी.
ही विशेष प्रकारची शंकरपाळी दिसायला खूपच सुरेख दिसते व बनवायला खूपच सोपी आहे.
ह्यात तुम्ही वेगवेगळे रंग घालून आणखीन आकर्षक बनवू शकता.
⭐साहित्य
एक वाटी मैदा
एक चमचा रवा
एक मोठा चमचा तूप
चिमुटभर मीठ
दुध
पाकासाठी एक वाटी साखर
वेलदोडे पूड आणि केशर
⭐कृती
प्रथम रवा मैदा मीठ एकत्र करून घ्यावं
एक चमचा तूप या मिश्रणाला चांगलें चोळून घ्यावे
लागेल तितके दुध अथवा पाणी घालून घट्ट भिजवुन झाकुन ठेवावे
⭐दोन तास हा गोळा भिजू द्यावा
एक वाटी साखरेचा एक वाटी पाणी घालून एकतारी पाक करावा
पाक तयार झाल्यावर त्यात आवडीनुसार केशर वेलदोडे पूड घालावी व पाक बाजुला ठेवावा
⭐आता भिजवलेला मैद्याचा गोळा घेऊन परत हाताने मऊ करून त्याच्या पुरी साठी करतों तशा गोळ्या कराव्या व ओले फडके घालून झाकुन ठेवावे
⭐एक गोळी घेऊन त्याची पातळ पुरी लाटावी
मधल्या भागात चाकूने उभे छेद देऊन
पुरी आडव्या आकारात गुंडाळून वरचे आणि खालचे टोक चपटे करून देठासारखा आकार द्यावा
हा आकार चाफ्याच्या कळ्या प्रमाणे दिसतो
थोडा मैद्याचा वापर करून याच्या पाकळ्या अलगद मोकळ्या कराव्यात
⭐अशा सर्व चंपाकली करून झाल्या की
तेल कडक तापवून आच मंद करावी
व या चंपाकली तळून घ्याव्या
⭐तेल निथळून झाले पाकात टाकाव्यात
दुसरा घाणा तळून झाला की पहिल्यांदा टाकलेल्या चंपाकली बाहेर काढून ठेवाव्या
⭐वरुन ड्राय फ्रूट चुरा घालावा⭐