खुबी/खोबी रोटी
एक राजस्थानी रोटीचा प्रकार
एक वाटी कणीक, थोडे तूप आणि मीठ घालुन थोडी घट्ट भिजवली
अर्धा तास झाकून ठेवली
अर्ध्या तासानंतर पोळी सारखे लाटून त्यात तेल व पीठ पसरून लावले
(यामुळें आतून खुसखुशीत होते)
परत त्याची गुंडाळी करून गोल पोळी लाटली
फार पातळ लाटायची नाही
जाडसर हवी
पोळीला वरून चाकूच्या साह्याने थोडया चिरा दिल्या
ही रोटी जड असल्याने या चिरा मुळे लवकर भाजली जाते
चिरा दिलेली बाजू तव्यावर भाजायला टाकावी
तोपर्यंत चिमटी ने या पोळीवर गोलाकार छोटे छोटे चिमटे काढले
हे चिमटे आपापल्या कृतीशिलते प्रमाणे काढावे
आपले डिझाईन आपण तयार करावे 🙂🙂
तव्यावर हात भाजत असेल तर पोळी भाजायच्या चिमटा घेउन त्याने हे चिमटे काढावे
रोटी खालून कडक भाजली की
दुसऱ्या गॅस वर चिमटे काढलेल्या बाजूने भाजुन घ्यावी
अथवा
भरपुर तूप सोडून दोन्हीकडून भाजुन घ्यावी
ही रोटी चवीला बिस्कीट सारखी खुसखुशीत होते
यात मीठ हळद तिखट ओवा घालून मसाला खुबी रोटी सुध्दा करता येते
सोबत
नारळ, शेंगदाणे, तिखट, हळद, मीठ गूळ घालून वाटलेली चटणी
वर हिंग मोहरी कढीलिंब फोडणी