☀️तांदुळ पिठीची कडबोळी
अत्यंत कमी वेळात आणि कमी साहित्यात होणारा खुसखुशीत सोपा प्रकार
ही कडबोळी चहा सोबत अथवा दह्यासोबत खायला छान लागतात
☀️साहित्य
एक वाटी तांदुळ पीठी
पाव वाटी लोणी
दोन मोठे चमचे ओले खोबरे
थोडे तीळ
हळद
काळी मिरी पावडर पाव चमचा
मीठ चवीनुसार
☀️कृती
प्रथम तांदुळ पीठी कढईत मंद आंचेवर हलकी भाजून घ्या
(यामुळे पीठी हलकी होते व पदार्थ चवदार होतो )
गार झाल्यावर याला पाव वाटी लोणी चांगले चोळून घ्या व
त्यात काळी मीरी पावडर, खोबरे तीळ, थोडी हळद, मीठ हे सर्व घालून मिसळून घ्या
☀️ पाणी थोडे कोमट करून त्या पाण्याने हे पीठ चांगले भिजवुन घ्या
व अर्धा तास झाकून ठेवा
अर्ध्या तासाने हे पीठ चांगले मळून घ्या
एक छोटा गोळा घेऊन पोळपाटावर त्याची लांबट वळकटी करा
☀️ याचे इंचभराचे छोटे तुकडे काढून हाताने गोलाकार करून दोन टोके जोडून घ्यावीत
अशा सर्व पिठाच्या गोलाकार कडबोळी तयार करून घ्याव्या
मंद आचेवर गरम तेलात तळून घ्यावेत
याला फोटोत दाखवली आहे तशी आतून चांगली चकली प्रमाणे नळी पडते
अत्यंत खुसखुशीत होतात
गार झाल्यावर भरुन ठेवाव्या
घट्ट झाकणाच्या डब्यात पंधरा दिवस या कडबोळी चांगल्या टिकतात