हात तुझा हातात घेता ,
न कळे भान मला वेळेचे ..
तुझ्या हातातून प्रोत्साहन, मिळे मला जगण्याचे..
तुझ्या हाता वरिल रेषा,
ठरतात माझ्या साठी भाग्याच्या ..
तुझा हात हाती घेता होई,
मला जाणिव निर्मळ प्रेमाची..
तुझ्या त्या निर्मळ प्रेमीतुन
येई माला आशा जगण्याची..
तुला पाहता होई
स्मरण मला रंभेचे..
तु माझ्या जिवनात येशील का❓
सखे सांग तुझा हात माझ्या हाती कायमचा देशील का ..❓
-Swapnil Jadhav