स्वतःला आकार देताना ,
कित्येकदा मी विस्कटलो
तरिही,विस्कटलेल्या तुकड्यांवरती ,
अधांतरी मी तरंगलो
विसरलो मी स्वतःस कितीदा ,
पुन्हा नव्याने सावरलो
आठवताच जून्या आठवणी ,
अश्रू बनूनी ओघळलो
अपयशाचा डोंगर चढत ,
यशाचा मार्ग पदक्रमलो
दिसताच नभी विजयपताका ,
थोडासा मग विसावलो...!