कालिंदीच्या तटावर उभी आहे मी,पाहते आहे नियतीचे खेळ! कालिया आता अस्तित्वात नाही असं मानून निःशंक झालेल्या माझ्या मनाला तो दंश करून गेला आहे!! माझा साधा भोळा अनय! त्याला कल्पनाच नाही आहे की एककल्ली आत्मकेंद्री अप्रगल्भ अशी सगळी विषं एकवटून फुत्कारतो आहे तो कालिया अद्याप!अज्ञानाच्या गूढ जलाशयात!! माझ्या अनया,अरे कसं समजावू मी तुला की हा विषगर्भी कालिया तुझं नंदनवनही कोमेजून टाकेल!!! धाव कृष्णा धाव!!! सृष्टी उत्पत्तीपूर्वीच्या त्या गूढगर्भी जलाशयातून त्वरेने ऊठ आणि सांभाळ!!!!तुझ्या पाव्याच्या सुमधूर स्वराने जाग आण तेजस्वी विचारांना!!! प्रकाशाची बेटं उजळू देत! प्रतिभेचे हुंकार उमटू देत!! तुझ्या सवत्स धेनूंच्या गळ्यातील घंटांच्या मंजुळ नादाने माझं नंदनवन फुलू दे,उजळू दे! बहरू दे!!!!
फोटो सौजन्य--गुगल इमेजेस