*।। राजा राममोहन रॉय ।।*
प. बंगालच्या राधानगरीत जन्मला एक पुत्र
सती जाणाऱ्या महिलेचे त्यांनी बदलले चित्र
राजा राममोहन रॉय असे त्यांचे होते नाव
जनजागृती व्हावी म्हणूनी फिरले गावोगाव
अभ्यास केला पुराण, कुराण बायबल ग्रंथ
बंगालीचा पाया रचिला लिहून वेदांत ग्रंथ
आधुनिक भारतासाठी केली सेवा समाजाची
तत्वज्ञान प्रचारार्थ स्थापिली ब्राह्मो समाजाची
लोकांनी दिली सजा मानून हिंदू धर्मविरोधी
दिल्लीच्या बादशहाने राजाची दिली उपाधी
- नासा येवतीकर