Marathi Quote in Religious by मच्छिंद्र माळी

Religious quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

###Good evening !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
# *!! हरतालिका !!*
--------------------------------

अखंड सौभाग्य रहावे यासाठी हरतालिकेचे व्रत केले जाते.भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेस हे व्रत करण्यात येते.'हर'हे भगवान शंकराचेच नाव आहे. शंकराची आराधना करण्यात येत असल्याने या व्रतास हरतालिका म्हणून संबोधण्यात येते.'हरी'हे भगवान विष्णूचे नाव आहे.हरतालिकेसंबंधी पौराणिक कथाही आहेत.पार्वतीने एकदा आपल्या सख्यांना सोबत घेऊन हे व्रत केले होते.कालांतराने हे हरतालिका व्रत म्हणून प्रसिद्ध झाले.या व्रतासाठी हरतालिका किवा हरितालिका दोन्ही शब्दांचा उपयोग करण्यात येतो.
हरतालिका व्रत सर्व पाप व कौटुंबिक चिंतांना दूर करणारे आहे.शास्त्रात या व्रताबाबत 'हरित पापान सांसारिकान क्लेशाञ्च',अर्थात हे व्रत सर्वप्रकारचे दु:ख,कलह,व पापांपासून मुक्ती देते,असे म्हटले आहे.शिव-पार्वतीच्या आराधनेचे हे सौभाग्य व्रत फक्त महिलांसाठी आहे. निर्जला एकादशीप्रमाणेच हरतालिका व्रताच्या दिवशीही उपवास पाळण्यात येतो.पार्वतीने भगवान शंकराशी लग्न करण्यासाठी हे व्रत केले होते.पार्वतीच्या इच्छेची पूर्तीही याच दिवशी झाली होती. 

पतीप्रती आपली भक्ती व इच्छित पती मिळावा यासाठी या व्रताचे पालन करण्यात येते.इच्छेनुसार पती मिळावा यासाठी मुलीही या व्रताचे पालन करतात.व्रतात आठ प्रहर उपवास केल्यानंतर अन्नसेवन करण्यात येते. व्रतापासून मिळणार्‍या फळाचे वर्णन'अवैधव्यकारा स्त्रीणा पुत्र-पौत्र प्रर्वधिनी'असे करण्यात आले आहे.अर्थात जीवनात सुख लाभण्यासाठी व्रताचे विधिपूर्वक पालन करण्यास सांगण्यात आले आहे.भविष्योत्तर पुराणानुसार हरतालिका व्रताच्या दिवशी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेस'हस्तगौरी,'हरिकाली 'कोटेश्वरी' व्रताचेही पालन करण्यात येते.दुसर्‍या शब्दात सांगायचे झाल्यास हरतालिका व्रत या नावानेही प्रसिद्ध आहे.यामध्ये आदी शक्तीमाता पार्वतीचे गौरीच्या रूपात पूजन करण्यात येते. भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीयेच्या दिवशीच हस्तगौरी व्रताचे अनुष्ठान होते.महाभारत काळातही हे व्रत पाळण्यात येत होते,याचा संदर्भ आढळतो.भगवान श्रीकृष्णाने राज्यप्राप्तीसाठी,धन-धान्याच्या समृद्धीसाठी कुंतीस या व्रताचे पालन करण्यास सांगितले होते.यामध्ये तेरा वर्षांपर्यंत शिव-पार्वती व श्रीगणेशाचे ध्यान करण्यात येते. चौदाव्या वर्षी व्रताचे उद्यापन करण्यात येते.

*हरतलीका पुजा कशी करवी*

गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला“हरतालिका`असे म्हणतात.या दिवशी मुली व सुवासिनींनी सुवासिक तेल लावून स्नान करावे.स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवावे.रांगोली काढून व केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे.उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा.समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी, खारीक,बदाम, नाणे,फळ ठेवावे.

सर्वप्रथम स्वत:ला हळद कुंकु लावून देवासमोर विडे ठेवावे.अक्षता,हळद कुंकु वाहून मनोभावे नमस्कार करावा.घरातील वडीलधार्‍या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी.पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजाही करावी.सर्वप्रथम गपपतीची आणि नंतर महादेव -पार्वतीची षोडशोपचारे पूजा करावी.पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे.पूजेसाठी लागणारे साहित्य असे आहे:चौरंग,रांगोळी,तांदूळ, पाण्याचा कलश,ताम्हण,पळी,पंचपात्र,तसराळ,आसन, निरांजन,शंख,घंटा,समई,कापूरारती,हळदकुंकू,अष्टगंध, गुलाल,बुक्का,चंदन,अक्षता,उदबत्ती,कापूर,तुपाच्या व तेलाच्या वाती,अत्तरफाया,विड्याची पाने,सुपार्‍या,बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गूळखोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र, तसेच फणी, काजळ, गळेसरी, कांकणे, आरसा इत्यादी सौभाग्यद्रव्ये. याव्यतिरिक्त फुले, दूर्वा, तुलसीपत्रे, व झाडांची पाने.

 पूजा केल्यावर धूप-दीप, नैवेद्य दाखवून पत्री वाहावी. हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्यांचे क्रम असे आहे: बेल, आघाडा , मधुमालती , दूर्वा , चाफा , कण्हेर , बोर , रुई , तुळस , आंबा , डाळिंब , धोतरा , जाई , मरवा , बकुळ, अशोकाची पाने वाहावी. नंतर मनोभावे प्रार्थना करावी. कुमारिकेने इच्छितत वर मिळविण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी. दिवसभर कडक उपोषण करावे. शक्य नसल्यास फलाहार करावा. या दिवशी आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाहीत. नंतर रात्रभर झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकून, आरती करून बारानंतर रूईच्या पानावर दही घालून ते चाटावे. दुसर्‍या दिवशी उत्तरपूजा करून ती लिंगे विसर्जन करावी.

ॐ✝︎︎ॐ✝︎︎ॐ✝︎︎ॐ

Marathi Religious by मच्छिंद्र माळी : 111246827
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now