छत्री असली की पाऊस येत नाही.
छत्री नसली कि पाऊस धो धो येतो.
किती खट्याळ पाऊस आहे.!!१!!
मला वाटते तुला भेटावे.
तुला पावसात भिजवावे.
नदीच्या पुलावर मन
भरून पाहावे.
वाहत्या पाण्याच्या
पाण्याप्रमाणे खंत
व्यक्त करावे.
छत्री असली की पाऊस येत नाही.
छत्री नसली कि पाऊस धो धो येतो.
किती खट्याळ पाऊस आहे.!!२!!
कधी येणार म्हणते तु येतं नाही.
मी येणार म्हणतो तु वाट पाहते
तू कधी मला भिजवून टाकते
कधी तु मला भिजवून टाकते
हा पाऊस आपल्या मनातील
भावना असलेल्या प्रेमाच्या
झिजवून टाकतो.
छत्री असली की पाऊस येत नाही.
छत्री नसली कि पाऊस धो धो येतो.
किती खट्याळ पाऊस आहे.!!३!!
प्रेमात खरं खोटं बोलायचं
पावसात चिंब भिजायचं
एक मेकांच्या सहवासात
आठवणीत राहायचं.
अशीच शेवटपर्यंत
हातात हात मिळवून
साथ दयाचं
छत्री असली की पाऊस येत नाही.
छत्री नसली कि पाऊस धो धो येतो.
किती खट्याळ पाऊस आहे.!!४!!
पावसाची रिमझिम सुरूच राहते
पावसा संगे अशीच मिठीत येते
माझ्या डोळ्यात डोळे
घालून एकटक पाहते
तुझीच रोज आठवण येते भिजयला
मनाला स्पर्श करुन जाते
छत्री असली की पाऊस येत नाही.
छत्री नसली कि पाऊस धो धो येतो.
किती खट्याळ पाऊस आहे.!!५!!