Marathi Quote in Poem by Suresh Seetabai Kisan Sargar

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

बदलतोय महाराष्ट्र 


खरंच महाराष्ट्रात बदल घडतोय 
गुन्हेगार मोकाट फिरतोय 
जनतेमध्ये स्फोट करणारा 
आरोपी आजही तुरुंगात 
व्ही.आय.पी.सेवा कसा काय  उपभोगतोय 
इतर सामान्य गुन्हेगार प्रमाणे 
त्या आरोपींना सुध्दा शिक्षा द्यायला 
तुरुंग अधिकारी कसा काय विसरतोय 
खरंच महाराष्ट्रात बदल घडतोय 
प्रामाणिक पोलीस अधिकारी सुद्धा 
दहशतवाद्यांकडून मारला जातोय 
त्याच्या 'ए.टी.एस.'तर्फे शोधलेले संशयित 
गुन्हेगार 'एन. आय. ए.' ला अमान्य वाटतोय 
'ए. टी.एस.' चा गुन्हेगार 
'एन. आय. ए.'चा पुरावा सुध्दा 
कसा काय खोटा ठरतोय 
होय, महाराष्ट्रात बदल घडतोय 

अवैध्य कामांना चाप लावणारा 
भ्रष्टाचाराला रोखणारा जनतेच्या 
सुधारणेसाठी प्रामाणिक पणे 
  काम करणारा अधिकारी 
लोकप्रतिनिधी कडून अविश्वास पात्र ठरतोय 
       संसदेतील अधिवेशनातील 
         घोळ कुठे मिटतोय 
प्रत्येक अधिवेशनात गदारोळ  असतोय 
जे सत्तेत होते तो विरोधी बाकावर 
विरोधी बाकावरील सत्तेत बसतोय 
   घोषणांचा पाऊसच पडतोय 
  अंमलबजावणीचा दुष्काळ कुठे हटतोय 
देश म्हणजे घर आहे. घराला सावरणार 
कुटुंब प्रमुख घरावरील कारवाईकडे 
   कसा काय ऐवढे दुर्लक्ष करतोय 
लोकांपुढे अतिरेकी गुंड यांच्यावर 
कारवाईचा ढोंगीपणा दाखवतोय 
स्वतःच मात्र बॉम्बस्फोट करण्याच्या 
     कारवाईत सहभागी असतोय 
तो आज ही 'व्ही.आय.पी'.सेवा उपभोगतोय 
         खरंच महाराष्ट्रात बदल घडतोय 
    
        समाजाने मोठा केलेला माणूस 
मद्यधुंद अवस्थेत रस्तावरील माणसे चिरडतोय 
समाजाला चिरडलेल दुःख कसा काय विसरतोय 
    हा माणूस पैसा दाबून न्यायालयातून 
         निर्दोष कसा काय सुटतोय 
त्या कुटुंबाला पैशाने कुठे सुख विकत 
           घेऊन देऊ शकतोय 
समाजाचा चाहता असणारा समाज चिरडतोय 
होय, खरंच. ..महाराष्ट्रात बदल घडतोय    

होय,महाराष्ट्रात बदलतोय 

कवी.  सरगर सुरेश सिताबाई किसन (SK)

Mo. 8605871150 / 9595279796

Marathi Poem by Suresh Seetabai Kisan Sargar : 111225547
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now