"कुलस्वामिनी श्री रेणुका माता"
माहूरची श्री रेणुका माता,कोल्हापूरची श्री महालक्ष्मी माता,तुळजापूरची श्री भवानी माता,व वणीची श्री सप्तशृंगी माता ही महाराष्ट्रातील देवींची साडेतीन पीठे आहेत.
(वणीची अर्धे पीठ मानतात) ,या पैकी एक प्रत्येक घराण्याची कुलदेवता असते, कुलदेवता
आपल्या घराण्याची रक्षण करणारी,उत्कर्ष
करणारी असते म्हणून कुलदेवतेची सेवा
सर्वश्रेष्ठ आहे.त्या करिता प्रत्येकाने कुलधर्म
कुलाचार केले पाहिजे.त्याच बरोबर देवीचे
कवच,अर्गाला व कवच नित्य नेमाने वाचले पाहिजे.(क्रमशः)