#kavyotsav2
"आजही पुढे जाताना...!"
आजही पुढे जाताना मागे वळून बघते ,
बघता बघता स्वतःच्याच जगात रमते .
बहरलेल्या आठवणींना ताजे करते .
आजही पुढे जाताना मागे वळून बघते ,
तुटलेली नाती पुन्हा जोडु पाहते .
येणाऱ्या पावलांना सोबत घेऊन जाते .
आजही पुढे जाताना मागे वळून बघते ,
समुद्राच्या लाटांना खट्याळपणे छेडते .
नाजूकश्या फुलपाखरालाही भुरळ लावते .
आजही पुढे जाताना मागे वळून बघते ,
परतीच्या वाऱ्यासोबत वाहत जाते .
आणि मग शेवटी नव्यानेच जगते .
आजही पुढे जाताना मागे वळून बघते ,
मी वेडी बघतच राहते .......!