सोना..
बघ अचानक काल टाकीचा प्रॉब्लेम आला
सगळी टाकी रिकामी
मग समजल टाकी ओव्हरफ्लो पण होत होती
बॉल बदलायला झाला होता
केला राजुला फोन
आज चटकन येऊन बॉल बदलून गेला
तेव्हा तुझी आठवण करून पैसे देऊन टाकले त्याचे
मागे एकदा तो असेच एका कामा साठी आला होता
पैसे विचारले तर काही नको म्हणाला होता
आणि निघून गेला
तू आत होतास बाहेर आल्यावर तू म्हणाला होतास
राजू नाही म्हणाला तरी त्याला पैसे द्यायला हवे होतेस
मलाही थोडी चुटपुट लागली आपण खरेतर कोणाचे श्रम फुकट नाही घेत
ते सगळ आज आठवले आठवले
आणि आणखी शंभर रुपये परत त्याला पाठवले
त्याचे देणे देऊन रिकामी झाले
आणि तुझी इच्छा सुद्धा पूर्ण केली
तसेच मुंबईत गेलो होतो तेव्हा
भाची सोबत शॉपिंग करायचे होते पण काही कारणाने तिला वेळ नव्हता
ती आली नाही तेव्हा तू म्हणालास अगं तिला वेळ नाही तूच पाच हजार रुपये देऊन टाकायचे ना
दोघी बहिणींचे शॉपिंग होऊन जाईल
मग तो विषय अर्धवट राहिला होता
आता मात्र त्या भेटल्यावर आठवणीने त्यांना अडीच अडीच हजार रुपये देऊन
तुझ्या बोलण्यातून समजलेली तुझी इच्छा पूर्ण केली