***क्षितीज***
क्षितीजाच्या पोटामधे
चंद्र सुर्याच घरट
येती जेथुन दोघेही
जाई तेथेच परतुन.
क्षितीजाच्या पाठीवर
इंद्रधनूष्याचा ताबा
दिसे सुंदर रूपडे
न हो कशाचीही बाधा.
क्षितीजाच्या पाठिमागे
नव्या पाखरांचे गाव
येती ऋतू जाती ऋतू
त्यांना परतीची हाव.
क्षितीजाच्या कुशी मधे
दाट ढगांचा हो डेरा
लखलखती विद्यूल्लता
सगळा आनंदी सोहळा.
??केदार शेवाळकर ??