८ डिसेंबर २०१८
भोग
भाळ रीते,
हात दोन्ही मोकळे,
हेच कोडे जीवनाचे,
ना दैव कुणी जाणीले,
दु:ख पचवत वेदनेचे,
आयुष्य सारे कंठले,
सुखदुख पापपुण्य भोग,
कर्म सारे आपुले,
सगे सोयरे दुश्मन सारेे,
सा-यांनीच एैश्वर्य माझे लुटले,
न जवळचे न कुणी दुरचे,
जग हे कुपमंडुक न माझ्या ओळखीचे,
तप्त दग्ध काळीज माझे,
धृवासम गोठले,
पेटते धगधगत निखारे,
अनायसेच शमले,
रक्षेत मितीचे कायमचे,
जीवनाचे गणित माझे हरपले,
प्रमेय आरक्त श्वासाचे,
कायमचे थांबले.
© म.वि.