प्रवास एका तासाचा...
आज एक प्रवास होऊन गेला तोही फक्त एक तासाचा पण या प्रवासामध्ये खूप काही शिकण्यासारखं आणि स्वतःच्या मेमरिकार्ड मध्ये साठवून ठेवण्यासारखं खूप काही मिळालं पण सांगायचे तर या एका तासाच्या प्रवासामध्ये इतकं काही मिळालं की या मुळे मी कधीच परिस्तिथी या कारणामुळे दुःखी होणार नाही कारण प्रत्येक परिस्तिथी ही चांगलीच असते फक्त त्याच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन हा चांगलाच पाहिजे परिस्तिथी ही चांगली किंवा वाईट ही कधीच नसते परिस्तिथी ही प्रत्येकाला प्रत्येकासाठी ही सेम असते आज मला इतकंच सांगायचं आहे की काही माणसं परिस्तिथीच्या इतक्या आहारी जातात की ती जगणेच विसरून देतात पण मला या एका तासाच्या प्रवासामध्ये जीवनामध्ये कस आनंदी राहायचं आणि इतरांना कस आनंदी ठेवायचं हे मात्र समजले आणि जीवन जगत असताना हे खूप महत्त्वाचं आहे कृपया बाहेरून काही घ्यायचं असेल तर काही चांगलंच घ्या
मी घेतलं ते ही फक्त एका तासाच्या प्रवासात......
लेखक
शुभम कानडे.