Quotes by shabd_premi म श्री in Bitesapp read free

shabd_premi म श्री

shabd_premi म श्री

@shabdpremi8384
(62)

.

 दोन मने Book Review


तुम्ही पुस्तक वाचायला लागता तेव्हा, पुस्तकातलं प्रत्येक पात्र हे तुम्हाला तुमच्या भोवताली आहे किंवा असायला हवं, त्याला त्याच्या बद्दल विचारता यायला हवं असं वाटायला लागतं, आता माझंच घ्या ना , माझी आवडती कादंबरी ही दोन मने, ती मी आज दुसऱ्यांदा वाचून संपवली, पण खरंतर कादंबरीत असलेल्या प्रत्येक पात्राची अशी भुरळ पडते की त्यांना वाचून संपल्यावर ते आपल्यासोबत असायला हवे किंवा त्या वेळी आपण तरी त्यांच्या जवळ असायला हवे होते अस वाटतं. बाळासाहेब, चपला, श्री आणि माईंभोवती फिरणारी ही कथा शेवटाला आल्यावर त्यांच्यात असलेल्या नात्याचा उलगडा होणं. वाचणाऱ्याला आश्चर्य चकित करून जातं. त्याहून लेखकाचं कौतुक करावं तेवढं कमीच. त्यांच्या जगात असताना त्यांचं एकदा तरी दर्शन व्हावं अस वाटून जातं कधी कधी. किमान स्वप्नात तरी त्यांचा भास व्हावा अशी इच्छा मनात येऊन जाते.

                     कादंबरीच्या शेवटाला आलो तेव्हा त्यातले तीन धडे म्हणजेच "मरणातून मिळालेले जीवन", "देवघरातला नंददीप" आणि "मरणात जग जगते",  हे तीनही धडे आपल्याही शेवटाला कुणी आपल्या शेजारी बसून ते वाचावेत अशी इच्छा होऊन गेली. आज कादंबरी संपली पण श्रीला भेटायची इच्छा काही पुरी होणार नाही म्हणून एक मन नाराज होते, तर दुसरे मन श्री नावाचा मित्र पुस्तकातून आपल्याला भेटला होता म्हणून समाधानी होते.

                     म्हणायला त्याच्या आयुष्यात चपला नकोच होती, असं कुणी तरी मागे म्हंटल होतं, मला वाटलं कदाचित त्यांची बाजूही बरोबरच असेल, पण मग चपला आलीच नसती तर श्रीला त्याव्हे वडील कोण आणि आई कोण हे कळलेच नसते. 

                     पुस्तक वाचायला घेतलं आणि हळू हळू तुम्ही त्यात रमून जाता, दिवसागणिक तुम्ही त्याच्या प्रेमात पडता मग ते पुस्तक एकदा वाचून सुद्धा मन भरत आणि, आणि मन भराव म्हणून पुन्हा वाचायला घेता, तरीही मन भरत नाहीच.

                     अखेर कादंबरीवर लिहिलेला हा दुसरा अभिप्राय आणि लेखक वि. स. खांडेकरांना शतशः नमन..



(टीप:- सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन असून, कथेचा कुठलाही भाग प्रकाशित करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे अनिवार्य...)


मयुर श्री बेलोकार

9503664664

Insta@shabd_premi

Read More

सामाजिक माध्यमं (social media)धोकादायक ठरत आहेत का...


काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट, आत्महत्या करण्यापूर्वी आपलं शेवटचं बोलणं, आपली इच्छा,आपल्याला झालेला त्रास बोलून दाखवत आपलं जीवन संपवलं. पण ती गोष्ट जेव्हा सामाजिक माध्यमांवर फिरू लागते, तेवढा बघणाऱ्यांच्या मनावरही परिणाम करून जाते.
आपल्या आयुष्यात काहीतरी मनाविरुद्ध घडलं, किवाकुनी वाईट घडून आणलं की प्रत्येकाच्याच मनात आत्महत्येचे विचार येतात.
हल्ली सामाजिक माध्यमांवर वयाचं बंधन नाही. त्यामुळे कुठल्याही वयोगटातला व्यक्ती कुठलीही गोष्ट पाहू शकतो. आणि त्यातल्या त्यात घरच्यांकडून मिळणारी मोकळीक. मग कुठलं आलं बंधन. एवढ्यात tiktok reel वापणाऱ्या तरुण मंडळींमध्ये आत्महत्या करून आयुष्य संपवण्यात खुळ माजलंय. मुळात आभासी आयुष्यात सर्वकाही मानून बसलेली ही पिढी खऱ्या आयुष्याला खोटं समजून बसलीये. त्यात आज वाचलेल्या बातमीने मन हेलावून गेलं. 14 वर्षाची ती मुलगी आत्महत्या करते आणि तिच्या आईच्या सांगण्यानुसार गेल्या तीन चार दिवसांपासून ती आत्महत्येशी संबंधित videos पाहत होती.
आत्महत्येपूर्वी video clip वगैरे सार्वजनिक करण्याची ही पहिली वेळ नाही. पण त्यामुळे आधीच मनधैर्य खचलेल्या तरुण पिढीच्या आत्महत्या करण्याच्या विचारांना बळकटी येतीये, ही लक्षात घेण्यासारखी बाब आहे.
मला भावनांची कदर नाही असं नाही, पण आपण केलेल्या गोष्टींमुळे कुणी आणखी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत असेल तर गोष्ट वाईटच ना.
सामाजिक माध्यमे हळू हळू आयुष्यात घुसून पार प्रत्येक गोष्ट Control करायला लागली तर कठीण होईलच ना. त्यात मग Blue Whale पेक्षाही ही सामाजिक माध्यमं घातक ठरू नये म्हणजे झालं.

Read More

बहीण

ही गोष्ट सगळ्यांनाच लागू होते, की एखादी गोष्ट जी कुणाकडे असेल तर त्याला त्याचं तेवढं मोल वाटत नाही. पण तीच गोष्ट जेव्हा आपल्याकडे नसते तेव्हा त्याचं वाटणारं मोल, हे थोडं असल्यापेक्षा जास्त असतं. आणि माझ्यासाठी ती गोष्ट म्हणजे, 'बहीण'.
घरात पाहिलं तर बहीण सोडून सगळीच पात्र भरलेली आहेत, पण ना आम्हाला बहीण होती, ना आमच्या वडिलांना. आहेत तर त्या मानलेल्या किंवा चुलत बहिणी, पण त्या मानलेल्या किंवा चुलत बहिणींना खऱ्या बहिणींची सर कशी येणार.
लहानपणी मी नाराज झालो की मग आईला म्हणायचो, आई मला का बहीण नाही ग, त्यांनाच का आहे. वाटायचं मोठी बहीण असती तर आई बाबांनी मारल्यावर तिच्या कुशीत जाऊन रडता आलं असतं, मग ती सांभाळून घेईल आपल्याला आणि लहान असती तर तिचे लाड पुरवतानाच आयुष्य निघालं असतं आपलं.
दर वर्षीच्या रक्षाबंधनाला, तेवढी राखी बांधावी म्हणून, चुलत बहिणींकडे तेवढा दिवस साजरा करून यायचं, बस नंतर वर्षभर काही पत्ता नाही.
आज काल एखादी गोष्ट प्रभावीपणे सामाजिक माध्यमांच्या मदतीने दाखवता येते, मग त्यात बहिण भावाचं प्रेमही आलंच. मग माझ्यासारखा जेव्हा ते बघतो तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी उभं राहतंच, सहजासहजी कुणालाही न दिसणारं. दाटून आलेल्या कंठालाही गिळंकृत करून टाकण्याशिवाय दुसरा पर्याय नसतोच समोर उभा
रक्षाबंधनाच्या दिवशी सामाजिक माध्यमांवर दिवभरातून एकदाही जरी डोकावून पाहिलं तरी तिथं आपल्या भावा बहिणीसोबत टाकलेला एक तरी फोटो असतोच, मग माझ्यासारखा जळकुंडी माणसाने मोबाईल बंद करून निपचित पडावं, एवढंच काय ते करण्यासारखं.
असो, शेवटी दुःख ही बोलून दाखवायची नसतात, ती गिळायची असतात अस वाटतं. कधीतरी मला हे लिहावं लागणारच होतं. ते आज ह्या वाकूळ मनाने लिहिण्यास भाग पाडलं.. कदाचित कुणाला कमीपणाचंही वाटून जाईल... पण शेवटी बहीण नसणाऱ्यांनाही दुःख असतंच...

Read More

पुस्तक

इतरांवर पुस्तक लिहितांना, तुझ्यावरही
पुस्तक लिह म्हणणारे भेटले मला...
मग मीही जोशात येऊन
घेतलं हाती लिहायला...

मध्येच मग अर्ध लिहूनझाल्यावर
माझ्या मित्राला पाठवून दिले...
सांग म्हणून मी पुस्तकात
असण्याच्या लायकीचा आहे म्हणून....

मित्र खुश होता, म्हणाला
तुझ्या दुःखाची चवच न्यारी रे....
आणखी लिहीत रहा, तुझ्या
पुस्तकाला खूप वाचक मिळतील ..

मला समाधान वाटले, आयुष्यात
मी कुठेच नाही पण माझं.....
दुःख लोकांना खूप रंजक
आहे अस वाटलं, त्याच....

म्हणून मी आता फक्त
दुखातच वावरतो....
सुखाची चाहूल लागली
की डोळे मिटून घेतो....

insta@शब्द_प्रेमी

18/7/20

Read More

मुस्कुराइए आप गलत जगह पर है..👍 आपल्या जिवंतपणाची किंमत जाणून घेण्यासाठी. तुला मरावं लागेल रे, तुझ्या गोष्टींना तेव्हा किंमत येईल बघ... सध्या तेच चाललंय... तू जिवंतपणी कितीही ओरड, कितीही समजून सांगण्याच्या प्रयत्न कर. तुला ते टाळतीलच, मग तेवढ्याच जोशाने त्यांच्या डोळ्यांतून, तू गेल्यावर पाणी दिसेल वाहताना, तुला नाही, इतरांना...बरं! जगाची रीत झालीये, असताना किंमत केल्यापेक्षा गमावल्यावर किंमत करण्यात त्यांना जास्त आनंद वाटतो. मेल्यावर उदो उदो करण्यात त्यांना खूप भावनिक वाटतं, मग, मग एखाद्या साध्या गोष्टीसाठी झुरावं माणसानं,
माणसानेच तयार केलेय ह्या जगात माणसालाच हव्याश्या गोष्टी मिळू नये एवढं कठीण होऊन बसतं का सगळं.. कठीण काहीच नाही अस म्हणता सगळे मग प्रयत्न करूनही का काही गोष्टी हाती लागत नाही माणसाच्या.. का त्या मिळवताना माणसंच आड येतात. का एवढं कठीण करून ठेवलंय सगळं.
समोरच्याला दुखावून काय मिळवायचं असतं ह्यांना. कुणास ठाऊक, त्यांना त्यांचा स्वार्थ पूर्ण करायचा असतो बस्स, मग समोरचा मरो का राहो, काय करायचंय, मनातल्या मनात तर कुठे हळू आवाजात बरा मेला, त्याच्या कर्मानं गेला अस म्हणत आपल्यावरचं पाप धुवून टाकायचं.. मग इतर लोक आहेतच आपली चूक लपवण्यासाठी खूप चांगला होता, करता हिता सगळं ऐकायचा होता चांगला कमवता होता अशी थोतांड मारून आपल्याला तो गेल्याच किती दुःख आहे हे पटवून द्यायचं लोकांना, पण खर कोण सांगेल की हेच मारेकरी आहेत म्हणून... ज्याला माहिती त्याने तर केव्हा रजा घेतलीये चितेला आग लागल्यावर

शेवटचा राम राम ठोकून सगळे निवांत व्हा.. काही दिवस गुणगान गा, त्याच ऐकलं असतं, त्याच्या मनासारखं करून दिल असतं, तर काही फरक पडला असता का ह्याचा आता विचार करा.... आणि त्या विचारांची राख करा...

Read More

लिहिणेच आयुष्य

RIP Sir

पू लं....