Quotes by Nandita Dalvi in Bitesapp read free

Nandita Dalvi

Nandita Dalvi

@nanditadalvi7474


चारी दिशा काळोखून येतात.
तरीसुद्धा चाचपडणे हा पर्याय असतो आपल्याकडे,
अंधारामुळे रस्ता दिसत नसतो, पण असतो मात्र निश्चितच.
म्हणून अंधाराला घाबरून हातबल होण्यापेक्षा, चाचपडत राहून प्रयत्नशील राहणे योग्य आहे. त्यामुळे आपला मार्ग आपल्याला एकदा एक दिवस नक्की मिळेल.

Read More

आपली माणसं आपल्यान सोबत असण,
आपली माणसं आपल्यासाठी क्रियाशील असणे
ही गोष्ट त्या कुटुंब प्रमुख यासाठी खूप दिलासा देणारी आणि समाधान देणारी गोष्ट आहे.

Read More

माझ्या स्मरणातील काही दुर्गा स्वरूप स्त्री व्यक्तिमत्व.....

पार्वती बनवून तू महादेवांना आधीन केलस. त्यांची शक्ती बनली म्हणून तू आदिशक्ती आहेस

 कुंती बनवून तू पंचमहाभूतांना अधीन केलस सामाजिक अवहेलना सहन केलस. कुमारिका माता बनून पण, तरीही सामाजिक बंधनांचा आदर केलास म्हणून तू सहनशील आणि आदर्श म्हणून अमर झालीस.

 गांधारी बनून  पतीसाठी स्वतःच्या डोळ्यांना पट्टी बांधून पत्नीधर्म निभाव लास आणि ह्याच पातिव्रत्याच्या सामर्थ्याने  भगवान  श्रीकृष्ण लाही   शाप देण्याइतपत तुझ्यामध्ये सामर्थ आलं.

 द्रौपती बनून तू पाच पतींना वरलस तरीसुद्धा एक प्रतिव्रता म्हणून ओळख बनवलं आणि दृढ भक्तीच्या जोरावर आणि विश्वासावर तू त्या क्रूर कौरवांसमोर खंबीरपणे उभी राहिली खरंच तुझ्या हिम्मतीला दंडवत.

 जिजामाता बनुन तु दैदिप्यमान छत्रपती शिवाजींना घडवलं,  छत्रपती शंभूराजांना घडवल तुमचे  ज्वलंत संस्कार त्यांच्या तनमन धनावर करून स्वराज्याची स्थापना केली, तुमचे ज्वलंत संस्कारांचा परिणाम म्हणून शंभूराजे मृत्युंजय झाले.


 झाशीची राणी बनवून तू अगदी अलीकडच्या काळात एका स्त्री मधील शौर्य आणि धैर्य दाखवून दिलास एक स्त्री राज्य सांभाळू शकते आणि राज्यासाठी लढू ही शकते. हे दाखवून दिलं.


 सावित्रीबाई फुले बनून तुम्ही स्त्रियांच्या शिक्षणाची आस  धरली. ज्या काळात स्त्रीला फक्त चूल मुलच माहित होतं. समाजाच्या ह्या मानसिक ते विरुद्ध तुम्ही लढाई लढली. बेडर आणि धिरोत्तम होऊन. तेव्हा तुमच्यावर दगड,  चिखल, शेण फेक झाली. पण आज मात्र तुमच्याकडे एक सुधारक आणि लढवय्या स्त्री म्हणून पाहिले जातंय खरंच तुम्हाला मानाचा मुजरा समाजाच्या विरोधात जाऊन पुन्हा तोच विचार समाज मान्य करणं हे खूप मोठं कार्य आहे.

 स्त्रियांनी स्वतःच्या संरक्षणासाठी स्वतःच सक्षम आणि खंबीर राहिलं पाहिजे. ताकत प्रत्येकातच असते तिला  जागृत करावी लागते.
 

Read More

अपने उपर सबसे जाता
अपने परिवार काही परिणाम होता है|
अपने परिवार में कुछ भी बिछडता है

तो, हम आपने बाहरी कार्य भी मन लगा कर नही करते
अपना परिवार बहुत महत्वपूर्ण रहता है|

Read More

खुद की जिंदगी जीना
और किसी की जिम्मेदारी बनकर जीना
दोनो मे फरक होता है|

रात्र संपणार आहे कारण
 सूर्योदय होणार आहे
 मेघ दाटले आहेत कारण
 पाऊस पडणार आहे
 मातीला गंध सुटणार आहे कारण
 धरती अंकुरणार आहे
 वेदना असाह्य होणार आहेत कारण
 आई पण येणार आहे
 पाने गळून पडणार आहेत कारण
 वसंत बहरणार आहे
 बालपण सरणार आहे कारण
 तारुण्य येणार आहे येणार आहे 
 म्हातारपण येणार आहे कारण 
 मोक्ष मिळणार आहे.

Read More

नातं हळूवार असाव, मग ते बहरते
 नात्यांमध्ये ओलावा असावा, मग ते टवटवीत राहते
 नात्यामध्ये विश्वास असावा, मग त्यात आदर वाढतो
 नात्यांमध्ये विरह असावा, मग त्यात ओढ वाढते
 नात्यांमध्ये सहवास असावा, मग ती मजबूत बनतात

Read More

कुछ रिश्ते प्यार बिना, विश्वास बिना
भी निभाये जाते है, केवलं जिम्मेदारी समजकर

.कोणी तरी असावं 
आपल्यावर भरभरून प्रेम करणार 
आपल्याला जीवापाड  जपणार 
आपली  काळजी करणार 
कोणी तरी असावं 
आपल्याला समजून  घेणार 
आपल्या स्वप्नाना ना  मजबूती  देणार 
मनाला  खणk र  बनवणार 
कोणी तरी असावं 
आपल  कौतुk  करणार 
आपल्याला दाद देणार 
कोणी तरी असावं 
आपल्या वर विश्वास  असणार 
आपल्या कडे  आधार म्हणून  पाहणार 
आपल मन मोकळ  करणार 

Read More

आई!!
एका स्त्रीला आई म्हणून जेवढा सन्मान मिळतो,
तेवढा एक स्त्री म्हणून सन्मान आणि आदर कधीच मिळत नाही
तिच्या बाळासाठी ती सर्वस्व असते.
बाळाला तिच्या शिवाय इतर कुठल्याही ठिकाणी सुरक्षित वाटत नसतं.

बाळाला आईपेक्षा मोठं काहीच वाटत नसतं.
बाळासाठी ती इतकी खास असते की, तिला अस
खासपण आणि मोठेपण इतर कुठल्याही नात्यात मिळालेल नसतं.
हेच बाळाचा प्रेम आणि ओढ तिला आयुष्यातील अडचणी संकटे खंबीरपणे झेलण्यासाठी ताकद देत
आयुष्यातले सगळे चढ-उतार आणि अपमान सहन करण्याची ताकद देते.
स्त्रीच्या जीवनातील सुंदर नातं म्हणजे आई!!
बाळाला जन्म देन ही एक असहाय्य वेदना आहे पण, ती सुंदर आहे. स्त्रीच्या जीवनाचे ती सोन करते.

Read More