Quotes by Minal Kulkarni in Bitesapp read free

Minal Kulkarni

Minal Kulkarni

@minalkulkarni171821


#शिकार

आज तो खूप
मधाळ बोलतो आहे..
कदाचित “शिकार”
नवी शोधतो आहे...

#दिल

शोर से टूटे हुए आईनेका
तू गम ना कर मीनल....
यहाॅं तो रोज कितने दिल टूटते है
और आवाज तक नही होती...
- मीनल

Read More

#मनाला
मनाला कितीदा मी समजावले
पहाताच तुला ते वेडावले
क्षण सारे मोहाचे विरताच बघ
प्रेम दोन्ही मनात दरवळू लागले...
- मीनल

Read More

#जन्म : चारोळी

जन्मासोबतच मृत्यू
आपली वेळ पाळून येतो...
अन् मनुष्य या दोन्हीमध्ये
आपले खेळ खेळून घेतो....
- मीनल

Read More

#आश्चर्य

नाव तुझे कुणी घेता
मज माझेच आश्चर्य वाटले...
विसरले होते तुला कधीचे
तरी पाणी डोळ्यात दाटले....
- मीनल

Read More

काव्योत्सव २.०
भावनाप्रधान

चांदणे पेरून जा

क्षणांवर माझ्या मोहर तुझी कोरून जा
नको चंद्र पुनवेचा, थोडे चांदणेच पेरून जा

पिंजून ढगास वस्त्र शुभ्रतेचे घे विणूनी
जाता जाता थोडी निळाईही पांघरून जा

किती वाट पाहिली माझ्यातल्या चातकानी
होऊन थेंब हलकेच मनात खोल झिरून जा

तुझ्यासाठीच होता ठेवला वसंत हा जपूनी
आज इथल्या फुलांसवे तूही बहरून जा

साक्षीला आहेत साऱ्या विखुरल्या आठवणी
पसारा माझ्या मनीचा एकदा आवरून जा

रंग माझ्या प्रेमाचा नकोच घेऊस ओढुनी
सावळ्या रंगात रंगल्या राधेस फक्त स्मरून जा

एकदाच ये अशी बंध सारे तोडूनी
स्वत:लाच माझ्याकडे कायमचे विसरून जा
- मीनल

Read More

काव्योत्सव २.०
भावनाप्रधान

एक क्षण

जास्त नाही मागणं माझं
मला फक्त एक क्षण जगायचंय…..
एक क्षण तुझा माझा
पहिल्या पावसात भिजलेला
लाटांच्या हिंदोळ्यावर
अलगदपणे निजलेला
एक क्षण तुझा माझा
फुलपाखरांच्या पंखांचा
धरू पहाता उरलेल्या
बोटांवरच्या रंगांचा
एक क्षण तुझामाझा
रातराणीच्या फुलातला
दोघांच्याही नकळत
दरवळणाऱ्या मनातला
त्या एक क्षणासाठी
सारं आयुष्य त्यागायचंय….
जास्त नाही मागणं माझं
मला फक्त एक क्षण जगायचंय…..

तुझामाझा श्वास एक
तुझामाझा ध्यास एक
तुझीमाझी स्वप्नचं काय
तुझामाझा भास एक
तू नेहमीच होतास सोबत
हातहाती घट्ट धरुन
तरीही तुझामाझा तो क्षण
काळाच्या ओघात गेला विरुन
तुझ्यामाझ्या क्षणासाठी तरी
एकदा हे कालचक्र थांबवायचंय…..
जास्त नाही मागणं माझं
मला फक्त एक क्षण जगायचंय…..

कधी क्षितिजावर दिसलेला
कधी चांदण्यांमधून हसलेला
तुझ्यामाझ्या हक्काचा
पण जवळ नसलेला
मनातल्या मनात कितीदातरी
कोरीव अक्षरात गिरवला होता
तुझ्यामाझ्याकडूनच
तो कधी हरवला होता
हरवलेल्या त्या क्षणात
अख्ख आयुष्य कोरायचंय……
जास्त नाही मागणं माझं
मला फक्त एक क्षण जगायचंय…..

कारण नसतानाही जेंव्हा
आपण खूपखूप भांडत राहिलो
तुझेमाझे वेगवेगळे
जुनेच हिशेब मांडत राहिलो
हिशेब चुकते करता करता
एक हातचा राहून गेला
तुझामाझा तो क्षण
डोळ्यावाटे वाहून गेला
ओघळणाऱ्या त्या क्षणाला
अलगद ओंजळीत टिपायचंय
जास्त नाही मागणं माझं
मला फक्त एक क्षण जगायचंय…..
मला फक्त,
एक क्षण जगायचंय……..
- मीनल

Read More

#Kavyostav 2.0
भावनाप्रधान


हम चेहरे पढ लेते थे कभी
किताबोंकी तरह.....

हम चेहरे पढ लेते थे कभी
किताबोंकी तरह.....
हर मुस्कुराहटमे छुपे
सवालोकी तरह...
चेहेरे की एक झुर्री
सारी कहानी बता देती...
आखोंकी नमी जागी रात की
निशानी बता देती....
मुलाकात को लब्जोकी
जरुरत ही न थी कभी
उनका पलके उठनागिरना
था जवाबोंकी तरह...
हम चेहरे पढ लेते थे कभी
किताबोंकी तरह......
चेहेरेकी सिलवटोंमे
छुपा लेते थे वो राज कई
हमसे नजरे चुराने के
उनके अंदाज कई
उनके सामने रहनेकी
इजाजत न थी हमे
फिरभी बस जाते थे पलकोमें
हम ख्वाबोंकी तरह....
हम चेहरे पढ लेते थे कभी
किताबोंकी तरह....
वो दाँतोतले उंगली दबाना..
बेवजह जुल्फोंको सवारना..
उनकी हर अदामे हजार
बाँते होती थी....
हम याद करते थे उन्हे
दिवानोंकी तरह....
हम चेहरे पढ लेते थे कभी
किताबोंकी तरह...
इस बातको अब
एक जमाना गुजर गया...
उनकी आँखोमे आजभी
वो दर्द पुराना उतर गया...
आजभी होठोंने
उनके चुपी साधी थी...
पढना चाहता था
वो बात जो कभी आधी थी...
उनके चेहरे की
किताब के सारे पन्ने खुले थे...
बस पढ ना पाया वो शब्द
जो शायद वक्त के साथ
हो गये धुंदले थे....
बिलकुल मेरी आँखोंकी तरह...
हम चेहरे पढ लेते थे कभी
किताबोंकी तरह....
- मीनल

Read More

# Kavyostav 2.0

विषय : अध्यात्म


मुक्त

सोड घरटे तोड बंध
उधळून टाक श्रृंखला
रे मना घे भरारी
वणवा कधीचा पेटला

कां जळशी कां झुरशी
जर काहीच नाही आपुले
जे होते इथलेच होते
सारीच ती कागदी फुले

राग लोभ व्देष मत्सर
आसक्ती आणि बंधनं
निरर्थक मिथ्थाच सारे
सत्य जागृक स्पंदनं

आत्म्याचा परमात्म्याशी
थेट चालला संवाद रे
नेणिवेच्या पल्याड गेला
जाणिवांचा हा वाद रे

मोह माया भास फक्त
प्राक्तनांचे जाळेच ते
अडकू नको आता कुठेही
बोलावणे बघ आलेच ते

घे समाधी हो मुक्त तू
देहाची या फिकीर कशास
ज्या मातीतून आला होता
त्याच मातीस अर्पिला आज..
- मीनल
*********************************

Read More