( पाच वर्षानंतर )
सकाळी सकाळी श्वेता ची आवराआवर चालू असते. आठ वाजले असतात , ती जोरजोरात अनुराग ... अनुराग.. अनुराग अरे...उठा रे! किती रोज रोज त्रास देता मला तुम्ही तिघे ! प्रिन्सी आणि अनुराग जागे असतात , ते बेडवर झोपून राहिल्याची नक्कल करत असतात . दोघे ही हळूच डोळ्यांवरून ब्लँकेट खाली करून हसत असतात.अनुराग मुद्दाम हून श्वेताला चिडवण्यासाठी नाटक करत असे ! आणि नेहमीच प्रिन्सी त्याच्या प्रत्येक क्राइम मध्ये त्याची क्राइम पार्टनर म्हणून साथ देत असे!खरंतर आज नेहमी पेक्षा जास्त आरडा ओरड या साठी चालु होता कारण आर्या आज सहा वर्षांची होणार होती ! आणि प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षी ही यांना तिला ती डोळे उघडण्याआधी surprise द्यायचं होत ! आर्या जरी आज सहा वर्षाची झाली असली तरी ती तीन वर्षाच्या मुलीसारखी वागत होती आणि तीन म्हणूनच आज तिला एक नवीन प्रवासाची सुरुवात करून द्यायची असं अनुराग आणि श्वेता ने ठरवलं होतं. आर्या उठण्याआधी प्रिन्सी , श्वेता , अनुराग यांना तयार होऊन तिच्या समोर यायचं होत . श्वेता ने प्रिन्सी आणि अनुराग यांना एकमेकांना हळूच डोळे मारताना श्वेता ने गुपचूप बघितलं होतं ! म्हणून ती ही गुपचूप पुढे येऊन दोघांचे ही अंगावरील ब्लँकेट एकसाथ खेचते ! ( दोघे ही लाजून डोळ्यांवर हात ठेवतात.आर्या जरी आज सहा वर्षाची झाली असली तरी ती तीन वर्षाच्या मुलीसारखी वागत होती आणि तीन म्हणूनच आज तिला एक नवीन प्रवासाची सुरुवात करून द्यायची असं अनुराग आणि श्वेता ने ठरवलं होतं. आर्या उठण्याआधी प्रिन्सी , श्वेता , अनुराग यांना तयार होऊन तिच्या समोर यायचं होत . श्वेता ने प्रिन्सी आणि अनुराग यांना एकमेकांना हळूच डोळे मारताना श्वेता ने गुपचूप बघितलं होतं ! म्हणून ती ही गुपचूप पुढे येऊन दोघांचे ही अंगावरील ब्लँकेट एकसाथ खेचते ! ( दोघे ही लाजून डोळ्यांवर हात ठेवतात आणि दोघे ही जोरजोरात हसू लागले ) अनुराग उठून श्वेता जवळ गेला आणि म्हणाला ," अगं! किती घाई असते तुला ! प्रत्येक गोष्टींमध्ये perfection हवं असतं तुला! " यावर श्वेताने, " हो! हे तर आहेच ! असे उत्तर दिले ! "तितक्यात प्रिन्सी बेडवर उठून उभी राहिली . आनंद आणि उत्सुकता तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. ती जोरजोरात ओरडून बोलत होती," मम्मी, पप्पा या इकडे ! काय करताय तुम्ही ! चला आपण आपल्या प्रिन्सेस ला उठवूया !" अनुराग श्वेता ला ओढत बेड जवळ घेऊन येतो आणि म्हणतो " चला रुसुबाई!!! श्वेता हसत पुढे येते , आधी प्रिन्सी ला लव्ह यू बोलून तीची गालावर गोड गोड पप्पी घेते ! आणि प्रिन्सी पण लव्ह यू माय ब्युटीफूल मम्मा बोलून तीची पप्पी घेते 😍
अनुराग त्या दोघींना बोलतो "चला आता तुमचं माय लेकीच प्रेम पुराण संपलं असेल तर माझ्या लाडक्या मुलीला उठवूया का ? "
दोघी ही एकसाथ- हो... हो... ओरडतात ( दोघीही एकसाथ हसतात)
आता तिघे ही आर्याच्या एकदम जवळ जाऊन आजूबाजूला उभे राहतात. प्रिन्सी तर तिच्या उशीवर तिच्या जवळ जाऊन झोपते. श्वेता आणि अनुराग बेड च्या बाजूला खाली बसून आर्या कडे बघत बसतात ! तितक्यात श्वेताच्या डोळ्यांमधून अश्रू येताना अनुराग ला दिसतात , त्याला काहीही न सांगता तो तिला समजून घेऊन मिठी मारतो ! प्रिन्सी ने आता हळू हळू आर्याला उठवण्याचे प्रयत्न सुरू केले. ती आर्याच्या गोड गालांवर हात फिरवत होती .तिला ही गुदगुली होत होती , म्हणू ती झोपेत हळुवार हसत होती .आणि तिला इतक निरागस , छान हसताना पाहून श्वेता आणि अनुराग ही स्मित हसत असतात .
प्रिन्सी तिला आर्या ...आर्या.. cutie .. असे वेगळेवेगळे आवाज देऊन तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत असते . तितक्यात आर्या डोळे उघडते आणि अनुराग - श्वेता एकसाथ - happy birthday चे गाणे बोलू लागतात .. प्रिन्सी ही उत्साहाने त्याने सपोर्ट करत दुजोरा देते... ( आर्या खुप छान अशी स्माइल देते आणि Thank you बोलण्याचे प्रयत्न करत असते !)
प्रिन्सी बेडवरून उडी मारुन तिच्या study टेबल कडे धावत जाते . एक पेपर लपवण्याच्या प्रयत्न करत करत ती आर्या जवळ येते . अनुराग आणि श्वेता खूप प्रेमाने हे सगळ बघत असतात .ते प्रिन्सी कडे बघत म्हणतात "अरे व्वा! Surprise!!! " काय आहे बरं ? बघू बघू ?" ( प्रिन्सी आणि आर्या च्या उत्साहासाठी हे दोघे ही लहान होऊन प्रत्येक क्षण साजरा करत होते )
प्रिन्सी म्हणाली , नाही , नाही... कोणी जवळ नाही यायचं हा ..माझ्या क्यूट प्रिन्सेस साठी आहे हे !" अनुराग आणि श्वेता एकसाथ म्हणाले ..." Aww..😍"
प्रिन्सी आर्याला आधी हळूच उठवते , तिची छान छान पप्पी घेते आणि म्हणते हे बघ काय आहे ! ( आर्या सोबत बोलण्याची एक सर्वात उत्तम पद्धत म्हणजे चित्र हीच होती , ही प्रिन्सिने ओळखलं होतं !)
आर्या च्या डोळ्यावर प्रिन्सीने surprise साठी हात ठेवलेला असतो . पण तिने काहीतरी gift आणल्याची चाहूल लागताच.. आर्या ने हळूच डोळ्यांवरील हात बाजूला केला ... आणि तिचा gift शोधायला लागली... प्रिन्सीने एक सुरेख चित्र तिच्या हातात दिले. ते पाहून आर्या तर उत्साहाने उडी मारत होती आणि तिचा हा आनंद पाहून श्वेता आणि अनुराग ते चित्र पाहण्यासाठी धडपडत होते. पण आर्या इतकी आनंदात होती की तिला हे स्वतःहुन मम्मी आणि पप्पा यांना कधी दाखवणार अस झालं!
मग तिने त्या दोघांच्या डोळ्यावर हात ठेवून म्हणाली ... सर...प्राईज ...!
ते दोघेही थोडा वेळ डोळे बंद करून पुन्हा उघडतात ...
समोर असलेले चित्र पाहून श्वेता नकळत रडू लागली. तिला प्रिन्स मध्ये असणारा समजूतदार पणा , प्रेम पाहून जास्त भरून आलं होतं ...
अनुराग ने तर दोघींमधील हे प्रेम पाहून दोघींना ही दोन्ही हातांनी उचलून घेतलं!
( चित्र काय असेल? पुढील भाग नक्की वाचा)