The Aarya - 7 in Marathi Women Focused by suchitra gaikwad Sadawarte books and stories PDF | आर्या... ( भाग ७ )

Featured Books
Categories
Share

आर्या... ( भाग ७ )

   डॉक्टरांनी आर्या आणि आर्याचा हा जन्मतः असलेला आजात याबद्दल श्वेता आणि अनुराग यांना सविस्तर माहिती दिली .  त्यांनी ज्या परीक्षेची तयारी केली होती ती परीक्षा आता खऱ्या अर्थाने सुरू झाली होती . पण या वेळेस त्या दोघांनी ही मनाची तयारी करून समोर आलेला पेपर स्वीकारला होता.  डॉक्टरांनी सांगितल्या माहिती बद्दल श्वेता आणि अनुराग ने त्यांचे आभार मानले आणि त्यांच्या पुढील प्रवासासाठी तयार झाले .

श्वेता ही आता आर्या साठी स्वतःला कठोर बनवत होती आणि बऱ्यापैकी ती स्वतःला सावरुन हुशार झाली होती . आर्या आता हळू हळू नवनवीन हालचाल करू लागली . तिला आता बघता 9 महिने झाले होते . पण बाकी मुलांप्रमाणे ती नाही अस समजून कोणीही तिच्याकडून जास्त काही अपेक्षा करत नव्हते .

आर्या थोड थोड गुडघ्यावर येण्याचं प्रयत्न करत होती . तिची जितकी शारीरिक वाढ होती तितकी अजून सुंदर आणि आकर्षक दिसू लागली होती . तिच्या प्रत्येक हालचालीने पूर्ण कुटुंब खुश होत असे .

ती हालचाल तर करू लागली होती पण तिला ऐकू येत नव्हतं . बऱ्याच दा श्वेता आणि अनुराग यांनी डॉक्टरांना याबद्दल सांगितलं . पण त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्हाला सांगितल्या नुसार तिच्या काहीना काही गोष्टी सामान्य मुलांपेक्षा वेगळ्या असणारच .

बघता बघता आर्या आता एक वर्षाची झाली होती आणि सगळ्यांच्या लक्षात आल होत ती ऐकू आणि बोलू शकत नाही.  यामध्ये कोणती ही आणि कशा ही प्रकारची ट्रीटमेंट घेतली तरी तिच्या या एका गोष्टी मध्ये सुधारणा होणार नाही हे डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होत . आणि आता सगळे त्याप्रमाणे स्वीकारू ही लागले होते .

कधी श्वेता आणि अनुराग चे आई वडील आर्या ला बघितल्यावर भावूक होत असत. कधी बोलत ही असत तिचं हे दुःख अस बघवत नाही , ते नेहमी बोलत असतं आमच्या वाटेला आलेले सर्व सुख माझ्या आर्या ला मिळू दे ! प्रत्येक जण आर्यासाठी आशीर्वाद देत असे . श्वेता आणि अनुराग ने ही ठरवलं आपण आता दुसऱ्या मुलाचा विचार नाही करायचं . त्यांना फक्त आर्या ला त्यांचं सगळ प्रेम , काळजी , संस्कार द्यायचे होत .

ते दोघे आता आर्याचा पहिला वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतात. आता आर्या अकरा महिन्याची झालेली असते . ती बाकी गोष्टींमध्ये इतर मुलांपेक्षा जास्त सक्रिय होती . ती कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ओळखू लागली होती . ती आता स्पर्श , समोरच्याच्या चेहऱ्यावरील हावभाव समजू लागली होती . समोरचा थोडा ही वरच्या स्वरात बोलला तर ती रडत असे . तिला डोळे मोठ करून बोलले की भीती वाटत होती . तिला फक्त प्रेम आणि लाड याची सवय झाली होती . ती खूप छान हसत असे . तिच्या डोळ्यांमधून तिचं आनंद व्यक्त करत असे . हात आणि पाय यांनी सतत समोरच्याला मला उचलून घ्या , फिरायला न्या असे इशारे करत असायची .

आता सर्व जण तिच्या वाढदिवसाच्या तयारी साठी लागतात . प्रत्येक गोष्ट नवीन आणि वेगळी अशी असणार अस अनुराग च्या डोक्यात येत . त्याला असा कार्यक्रम हवा होता ज्यामध्ये फक्त बाकी लोक नाही तर आर्या स्वतः सहभाग घेईल . तिला त्याचा कंटाळा नाही येणार याचा विचार तो करत होता !!!

असं तो श्वेता समोर ही व्यक्त होतो आणि दोघे मिळून फक्त आर्या आनंदी कशी होईल , ती तिचा पहिला वाढदिवस आनंदाने , उत्साहाने कसा साजरा करेल याच्या तयारीला लागले !!!

आता त्यांनी फक्त लहान मुलांना मोठ्या संख्येने बोलवायचं निर्णय घेतला .  त्यांच्या साठी वेगवेगळे खेळ ठेवायचे आणि बऱ्यापैकी खेळ ही त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी काहीतरी चांगल संदेश मिळवण्यासाठी ठेवायचे हा हेतू होता ! लहान मुलांना ही सर्व मुलं ही आपल्यासारखी नसतात हे समजणे गरजेचे होते  . आणि हे त्यांच्या पर्यंत पोहचवणे हा अनुराग च प्रमुख उद्देश होता !!! 

आणि त्याप्रमाणे त्याने पुढील नियोजनाची सुरुवात केली . आणि सगळे तयारीला लागले .