जी मुलगी झोपेतून उठल्यावर ही सर्वांची नजर आकर्षित करून घ्यायची ती मुलगी आज त्या पांढऱ्या शुभ्र फ्रॉक मध्ये एक सुंदर परी दिसत होती . तिला बघताच क्षणी सगळेच आपल्या जागेवर उभे राहिले . आर्याला बघण्यासाठी प्रत्येकाच्या मनात कुतूहल होती. खरं तर त्याला दुसर ही कारण होतं पण आज वाढदिवस म्हणून या उद्देश्याने समजू या ! श्वेता आणि अनुराग ने ही तिच्या वर मॅचिंग असे कपडे घातले होते . स्टेज वर असलेला जोकर आर्या चे लक्ष वेधून घेण्यासाठी नवीन कृती करत होता आणि ती ही खूप खुश झाली होती . तिच्या आई वडिलांनी तिच्यासाठी घेतलेली मेहनतीला फळ मिळालं होत . थोड्याच वेळात अगदी कोणत्याही प्रकारचा गोंगाट , गोंधळ न करताच लहान मुलांनी आणि आर्या ने मिळून केक कापला . श्वेता आणि अनिकेत खुप काळजीने सर्व हाताळत होते. थोड्याच वेळात लहान मुलांना रिटर्न गिफ्ट दिले. मग तर काय ! गिफ्ट मिळाल्यानंतर सर्वच मूल खाली उतरू लागले ! हातात असलेले गिफ्ट्स उघडण्यासाठी त्यांची खूप गडबड चालू झाली होती . सर्व मुलं खाली उतरत असताना श्वेता ला एक हळुवार मऊ हाताचा स्पर्श तिच्या हाताला होत असल्याचे जाणवले. तिची नजर खाली गेली तर एक छोटीशी मुलगी तिला आवाज देत होती . काहीतरी विचारायचं प्रयत्न करत होती . तिने ही थोड खाली होऊन तिला विचारलं , "काय झालं बेटा! तुला गिफ्ट नाही मिळालं का ? " ती छोटीशी मुलगी तिचे ते दोन छोटे रबर लावून बांधलेले बो हलवून नाही म्हणाली , नाही काकी ! हे बघा माझं गिफ्ट! " श्वेताला तीच ते क्यूट बोलणं खूप जास्त आवडलं ! ती म्हणाली , ( तिच्या गालाला हात लावून ) अरे व्वा! मग काय हवं आहे तुला आता ! ती श्वेता कडे नाहीतर आर्या कडे बघत होती . श्वेता ने तिला विचारल्यावर पुढे ती शांत बसली आणि आर्याच्या पायाला हात लावत होती . श्वेता तिच्याकडे बघत बसली . इतक्या मुलांमध्ये ती एकच अशी मुलगी होती , जी जवळ येऊन आर्याला हात लावत होती . श्वेता ला खुप बरं वाटलं . ती अनुराग ला खुणावत होती , डोळ्यांनी दाखवत होती आणि इशारा करत होती ही कोण आहे ?
अनुराग ही त्या एकट्या मुलीला श्वेता च्या जवळ स्टेज वर थांबलेलं बघून त्यांच्या जवळ जातो . त्या मुलीला ही उचलून घेतो म्हणजे ती आर्या ला जवळून बघू शकते . त्याने त्याला उचलून घेतल्यावर ती खूपच खुश झाली . त्याला ही ती खूप आवडली ! आर्यासारखीच ती ही खूप सुंदर आणि निरागस होती . अनुराग तिला विचारतो , "बेटा , तुझं नाव काय आहे ?" ती लगेचच जोरात ओरडून म्हणते , प्रिन्सी ! श्वेता म्हणते , अरे व्वा ! खूप छान नाव आहे ! कोणासोबत आली आहेस तू ? ती म्हणाली , माझे आजी आजोबा ! ती लगेचच आजी आजोबाकडे हात दाखवते . ते दोघे ही स्टेज समोरच बसलेले होते. ते प्रिन्सी ची सगळी गम्मत बघत होते .
अनुराग आणि श्वेता थोडे चकित झाले होते , कारण त्यांनी त्यांना कधी बघितलं ही नव्हतं . तितक्यात प्रिन्सी ची आजी स्टेज समोर प्रिन्सी ला घेऊन जाण्यासाठी येते . पण प्रिन्सी काही जाण्यासाठी तयार होत नसते . ती अनुराग च्या हातावरून खाली सुद्धा उतरत नसते . पण आजी म्हणाली , प्रिन्सी आता खूप उशीर झाला आहे ! चल आपण घरी जाऊया ! तू उद्या ये हा आर्या कडे ! अस कसं तरी समजावत तिच्या आजीने तिला घरी जाण्यासाठी तयार केलं . अनुराग आणि श्वेता ने ही त्यांना ओळख नसल्यामुळे थोड फार बोलून त्यांचा निरोप घेतला .
आर्या चा वाढदिवस खूप छान झाला होता . पण अनुराग आणि श्वेता ती गोड मुलगी आणि आजी , आजोबा कोण होते या विचारात होते ! शेवटी अनुराग ने त्याच्या आई वडिलांना विचारलं , आपल्या शेजारी कोणी नवीन राहण्यासाठी आले आहेत का ? कोणी छोटी मुलगी ?
तितक्यात अनुराग ची आई पुढे येऊन म्हणाली , "अरे हो! तुम्हाला सांगायचं होत मी विसरून गेले ! आपल्या शेजारीचं आले आहेत , आजी आजोबा आणि त्यांची नात आहे ! खूप गोड आहे ती आपल्या आर्या सारखी ! मी च वाढदिवसाचा आमंत्रण केलं होत ! " तेव्हा अनुराग आणि श्वेता चा गुंता सुटला होता . श्वेता म्हणाली , बरं झालं , आपल्या आर्याला ही कोणीतरी खेळण्यासाठी सोबत मिळणार !
अनुराग म्हणाला , बरं हे सगळं ठीके ! पण त्या मुलीचे मम्मी पप्पा कुठे बाहेर असतात का ? हे ऐकल्यावर अनुराग ची आई थोडी शांत झाली . पुढे म्हणाली , नाही रे ( दुःखाच्या स्वरात) ! तिचे मम्मी पप्पा एका अपघातात गेले ! या मुलीच्या नशिबाने तिला ते त्या दिवशी आजी आजोबाकडे ठेवून गेले होते आणि म्हणून ती तरी आज.... !
हे ऐकून अनुराग ,श्वेता आणि अनुराग चे वडील ही सगळेच एकदम शांत होऊन गेले . श्वेता च्या डोळ्यांमध्ये पाणी होतं . तिच्या समोर फक्त ती गोड मुलगी प्रिन्सी येत होती !