Aarya ( part 14) in Marathi Women Focused by suchitra gaikwad Sadawarte books and stories PDF | आर्या ( भाग १४ )

Featured Books
Categories
Share

आर्या ( भाग १४ )

    आर्या आवाज देताच, श्वेता लगेचच आतमध्ये जाते . अनुराग थोडा नाराज होऊन श्वेता मागोमाग आतमध्ये जातो.

आर्याला भूक लागलेली असते पण श्वेता येण्याआधीच आजीने तिला जवळ घेऊन काहीतरी खाऊ भरवायला सुरुवात केलेली होती. श्वेताने जवळ जाऊन बघितले तर आजी आर्याला पेज देत होती. श्वेता हळूच म्हणाली, आई तुम्हाला काही तरी विचारायच होतं …( हळू आवाजात बोलता बोलता, अर्धवट बोलणं सोडून ती शांत बसली) ! आजी म्हणाल्या, “काय झालं? अशी अर्धवट बोलत शांत का झालीस ?”

श्वेता तरीही विचारात होती, कसं बोलू ? पण आजी ने तिला खांद्यावर हात ठेवून, डोळ्यांनी खुणावले ! मग ती म्हणाली, तुम्ही प्रिन्सिबद्दल पुढे काय विचार केला आहे ? तुमचे कोणी जवळचे नातेवाईक आहेत की जे प्रिन्सी ला नंतर सांभाळणार आहेत ? 

( शब्दांची सारवासारवी करत , ती पुढे म्हणाली, ते अनुराग विचारत होता म्हणून अस सहज विचारले)

आजीच्या डोळ्यात पाणी होतं . या बद्दल आम्ही दोघेही रोज सतत विचार करत असतो. ना आम्हाला कोणी जवळचे नातेवाईक आहेत ना आम्हाला कधी, असं कोणी प्रिन्सिबद्दल काळजीने विचारले आहे !

( आजीला भरून आलं होतं, तितक्यात डोळ्यातून अश्रू येऊ लागले , त्या बडबडू लागल्या ... आम्हाला रोजच लेकरच्या भविष्याची काळजी असते , हिच कस होईल , आपण काय करुया ? एखाद्या चांगल्या आश्रमामध्ये हिच ऍडमिशन कराव का ?असे बरेच विचार करतो आम्ही)

आजीना रडताना पाहून आणि त्यांचं बोलणं ऐकून श्वेताला ही रडू येत होते. तिने स्वतःला सावरले आणि म्हणाली, "आता बसं झालं! चला ! प्रिन्सची काळजी काही करू नका ! मी आणि अनुराग प्रिन्सीला श्वेता ची बहीण बनवण्याच्या विचारत आहोत !" 

आजी थोड्या विचारात होत्या ,पण थोड्याच वेळात त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच हसू आले . चक्क त्या श्वेताच्या पायाला हात लावायला जाऊ लागल्या ! श्वेताने त्यांना खांद्याला हात लावून उठवलं आणि उभ केलं , मिठी मध्ये 

घेऊन म्हणाली , हे तुम्ही असं मला लगेच परक करून टाकलं ? 

बरं चला आता ! मी माझ्या दोन्ही  मुलींना त्यांच्या पप्पा आणि आजोबांना भेटण्यासाठी घेऊन जाते . चला येताय ना आजीबाई !!! (पदराने डोळे पुसत , आजी तिच्या तिच्या मागे जाऊ लागली ).

 खाली आजोबा आणि अनुराग गप्पा करत होते. तितक्यात श्वेता म्हणाली, "अनुराग हे घे बाबा ! तुझ्या मुली !" खूप त्रास दिला आहे , आम्हाला दोघींना गप्पा ही करून देत नाही . तितक्यात अनुराग उठून पुढे आला , हो.. हो.. दे.. दे ..! (अस म्हणत त्याने आर्याला जवळ घेण्यासाठी हात पुढे केला) तितक्यात श्वेता म्हणाली, " मी काय म्हणाली, तू ऐकलं नाहीस अस वाटतय ?" अनुराग आर्याला जवळ घेण्यात मग्न होता . श्वेता म्हणाली , ही तुझी दुसरी मुलगी कोण घेणार ?

आता अनुराग ने आणि आजोबांनी ही स्पष्ट ऐकल होत जे श्वेता बोलली होती . आजोबांचे लक्ष आजी कडे गेले पण आजीच्या चेहऱ्यावरील हास्य आजोबांना नकळत काहीतरी सांगून गेल होत होतं! अनुराग ने प्रिन्सी ला जवळ घेतलं आणि तिची एक गोड पापी घेतली.

नंतर तो श्वेता कडे एकटक पाहत होता . श्वेताच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रु होते . तिने फक्त अनुराग ला मान हलवून होकार दिला होता . तो होकार कसला होता हे अनुराग ही समजून गेला होता .

त्याने पुढे जाऊन श्वेताला आनंदाने मिठी मारली . "मी जे विचार करत होतो ते तू करून दाखवलं का ?" ( अनुराग तिला हळू आवाजात विचारत होता) .

तिने बऱ्याच दिवसानंतर त्याला इतक्या आनंदामध्ये पाहिले होते. जितका खुश आर्या झाल्यावर तो होता तितकाच खुश आज ही झाला होता तो ! आता प्रिन्सी आपली मुलगी आहे हे समजल्यावर तर जास्तच आनंद झाला होता !

त्यानंतर त्याने आजी आजोबांच्या पाया पडून आणि मिठी मारून आभार मानले पण त्याच्यापेक्षा जास्त आभार आजोबा त्याचेच मानत होते. पुढे म्हणाले ,' आम्ही ही याच चिंतेत रोज असायचो, अगदी आम्ही बऱ्याच नातेवाईकांसमोर हा विषय ही काढला होता . पण असं कोणी तयार झालं नाही.  तुम्ही दोघे ही खरच खूप चांगले आहात ! खूप चांगले संस्कार आहेत तुमचे ! आणि तुम्ही खूप चांगलं सांभाळू शकता प्रिन्सीला याची खात्री आहे आम्हाला!' 

हे ऐकून अनुराग ची छाती एकदम भरून आली होती . एक लहान मुलाप्रमाणे तो श्वेता कडे सारखं पाहत होता . जी गोष्टी व्यक्त करण्यासाठी मी इतका विचार करत होतो , ती काही क्षणातच हिने अगदी सर्वांसमोर सांगितली आणि ती ही किती व्यवस्थित ! तिचे त्याला कौतुक वाटत होते !

आता फक्त काही दिवस प्रिन्सी आजी आजोबांसोबत राहणार होती . आजी म्हणाल्या ,  तिला आमची खूप सवय झाली आहे . ती राहू शकेल का आमच्याशिवाय ?( आजी रडू लागल्या ) तिला हे सर्व  समजवण्यासाठी वेळ लागेल ! तिला हे काही कळणार नाही !  ती आम्हाला नेहमी विचारत असते -  माझे मम्मी पप्पा कुठे आहेत पण आम्ही तिला अस काहीही सांगून विषय टाळतो ! पण ती आता रोज यापुढे आम्हाला दोघांबद्दल तुम्हाला विचारेल ! ( आजोबा , श्वेता , अनुराग ही शांत होऊन , आपले अश्रु पुसत असतात )

काही वेळासाठी सगळे शांत झाले होते . थोड्या वेळाने अनुराग म्हणाला , असं अचानक काही बोलून , ते लगेच  आजच आपण करणार असं काही नाही आहे ! आम्ही फक्त आमच्या मनात आलेला विचार तुम्हाला सांगितला आहे . तुम्हा दोघांना त्रास होईल असं आम्ही काही करणार नाही . जेव्हा कधी ही तुम्हाला वाटेल ,प्रिन्सी ला आमच्याकडे सोडाव, तेव्हा तुम्ही घेऊन या ! कुठल्याही प्रकारची जबरदस्ती आणि ओझ समजू नका . फक्त हे लक्षात ठेवा , ' आपण हा निर्णय फक्त प्रिन्सी साठी घेतला आहे आणि तुम्ही तिचा जीव आहात , तुम्हाला त्रास देऊन ती कशी खुश राहणार ?'

हे सगळ समजवल्यानंतर अनुराग श्वेताला म्हणाला , आपण निघूया ! त्यांना ही आपण अचानक बरेच धक्के दिले आहेत ! ( हसत हसत आजोबांना हात मिळवत म्हणाला , चला आम्ही निघतो )

तितक्यात श्वेता आर्या ला घेऊन निघण्यास तयार झाली . आजी ना हात लावून म्हणाली ," आराम करा ! विचार करू नका! सगळ ठीक होणार ! काहीही लागलं तरी आम्ही आहोत !"

अनुराग आणि श्वेता ला तिथून बाहेर पडण एकदम कठीण वाटतं होत, त्यांना हि काही कळत नव्हतं . त्या दोघांनी  प्रिन्सी ला जवळ घेऊन तिची पप्पी घेतली आणि आई बाबांची काळजी घे बेटा असं म्हणून ते निघाले !