Malika Aayushyalya anubhvanchi - 15 in Marathi Short Stories by Arpita books and stories PDF | मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 15

The Author
Featured Books
Categories
Share

मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 15

पान १५

आता आमचे शाळेचे दिवस बऱ्यापैकी चालले होते. म्हणजे शाळा, क्लासेस, अभ्यास, उपक्रम हे तर नेहमी चालू असायच. बऱ्यापैकी होस्टेल मध्ये पण, मन रमत होत.

पण कधी कधी अशी वेळ यायची. जेव्हा आपल्या घराची, आपल्या माणसांची गरज असते आपल्याला आधारासाठी, ती नव्हती कधी. वेळेप्रमाणे परिस्थितीत माणूस मिसळून जातो.

पाण्याच्या प्रवाहासारखा. इच्छा नसली तरी पुढे जात राहतो. कारण, थांबू शकत नाही आपण. आयुष्याच्या प्रवासात माणस येत जात असतात. आपणही घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे पुढे

ढकलत जातो. पण एक धागा मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी मागे सुटलेला असतो, आपल्याही नकळत.जेव्हा आपल्याला तो प्रवास आठवतो. अचानक मन पूर्ण त्या वेळात पुन्हा जात. त्या

वेळी नको असलेला तो टप्पा. आता हवासा वाटतो. मन तिथे जात, लहान होत, शांत होत. पुन्हा त्या आठवणीत रमत, काही काळासाठी अरे! सॉरी मी हे खूपच इमोशनल बोलतीये ना

आज. काही नाही आता मी हे लिहिताना एकटीच बसलीये. म्हणून, करतो आपल्याबद्दल. पण, ठीक आहे. हो तरं, आता २६ जानेवारी जवळ येतोय ना . तर , माझ्या लाईफ मधला २६

जानेवारी ते पण शाळेतला. सांगते, ऐका!

आमच्या शाळेत आजही एक नंबर उपक्रम होतात. पण, २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दोन दिवसांचा रुबाब एक वेगळाच. या काळातले दिवस आमच्यासाठी कोणत्याही

सणाच्या पेक्षा कमी नाहीत. त्याला कारण सुद्धा बरीच आहेत. एक महत्वाचं कारण म्हणजे मंडळी, या दिवशी आमच्या हॉस्टेल मध्ये आम्हाला जेवायला अनलिमिटेड पावभाजी

असायची. अजूनही आहे बरं का!

तुम्हांला वाटेल. यार ही साध्या पावभाजीच कौतुक काय सांगते. पण, आमच्या होस्टेल मध्ये कोणत्याही हॉटेल पेक्षा भारी चवीची पावभाजी असायची.काय माहोल असायचा तो

खरच. ताटात वरून तूप लावून खरपूस भाजलेले घाव, गरम गरम वाफाळलेली भाजी. त्यावर बारीक चिरलेला कांदा- कोथिंबीर आणि शेजारी लिंबाची फोड. खूप मोठा आनंद असायचा

यात. त्यात जेवताना कोण किती पाव खातय ? याची पैज तर लागत असायची. थोडक्यात तुम्हांला आमचा तो दिवस सांगते, २६ जानेवारी किंवा १५ ऑगस्ट च्या आदल्या दिवशी रात्री

बारा पर्यंत सगळ हॉस्टेल तिरंग्याच्या रंगाच्या फुलांनी फुग्यांनी सजवायच. मेस, बाईच ऑफीस, Passage सगळीकडे सजावट, रात्री बाराला आकाशात तिरंग्याचे फुगे सोडून आनंद

साजरा करायचो त्या दिवसाचा आदल्या दिवशी शूज पॉलीश करून, स्वच्छ गणवेश आणि सॉक्स धुवायचे. गादीखाली एका पेपर मध्ये गणवेश इस्त्री साठी ठेवायचो, आम्ही. पहाटे

लवकर उठवून छान तयार व्हायच. बाई sound वर देशभक्तीची गाणी लावायच्या. तयार होऊन शाळेत जायच. पण, आमच्याकडे भाषण वगैरे नसायच. वेगवेगळ्या विभागाच्या परेड

असायच्या. योगा, कराटे अशा खेळांची प्रात्यक्षिके, आणि विशेष सन्मान असायचा. झेंडावंदन केल्यावर हे कार्यक्रम झाले की, खाऊवाटप आणि सुट्टी. आल्यावर मस्त जेवण करायच.

टीव्ही वर जेवताना दिल्ली ची परेड पाहायची. छान झोप काढायची आणि संध्याकाळी पावभाजी आहेच. राव ! हा दिवस तेव्हा आमच्यासाठी सुख असायचा.

पण, या दिवसांमध्ये शाळेत जाम भारी वातावरण असायचे, म्हणजे, मैदानावर परेड ची practice, शिक्षकांची कार्यक्रमांची तयारी. त्यामुळे वर्गात आमचे रोजचे तास व्हायचे

नाहीत. म्हणजे तरी दुपारी ३ च्या पुढे वर्गात कोणीच शिकवायला नाही. आमच्या वर्गशिक्षिका प्रतिनिधींना कोण गोंधळ घालतय, ऐकत नाही त्यांची नाव लिहायला सांगायच्या.

आमची नाव कितीही वेळा लिहिली, बाईना सांगितली. तरी पण आम्हांला काहीच फरक पडायचा नाही. वर्गात कोणीच नाही म्हणल्यावर आम्ही कुठे बसतोय वर्गात. चाललो

फिरायला बाहेर कधी वॉशरूमच्या बाहेरच्या कट्ट्यावर बस, कधी पॅसेजमधून मैदानावरची रंगीत तालीम बघ, कधी पॅसेज मध्ये बसून गप्पा मार. कधी मस्त शाळेला मोठा Round

मारायचा, कोणाच्या वर्गात काय चाललय? हे बघायच. आम्हाला यात भारी मजा यायची. तेव्हा पूर्ण मैदानावर जागा नसायची, फिरायला. म्हणजे आमच्या शाळेत ना खूप परेड चे विभाग

होते. म्हणजे ड्रील, NCC सिनियर - ज्युनिअर, NSS, गाईड, समाजसेवा, स्वराज्यमंत्रीमंडळ या सगळ्या विभागांची परेड असायची. आता तुम्हांला स्वराज्यमंत्रीमंडळ लक्षात आल

नसेल. म्हणजे शाळेचा अध्यक्ष आणि सगळे मंत्री म्हणजे स्वच्छतामंत्री,अभ्यासमंत्री वगैरे हे सगळे. जेव्हा आम्ही फिरायचो ना मैदानावर तेव्हा त्याची परेड बघून खूप भारी वाटायच. सगळे

एक साथ एकामागून एक विभाग थांबलेले असायचे प्रत्येक विभागातल्या लीडर ची ऑडर, तिचा युनिफॉर्म, salute ठोकण्याची पद्‌धत जाम भारी वाटायच. पण, त्याच्यासाठी प्रत्येक

वर्गामधून नाव घेतली जायची. मैदानावर शेवटच्या दिवसापर्यंत selection व्हायच. मग शेवटी 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट साठी परेड व्हायची.

आपल्याला असल कधी येणार नाही हे वाटायचं म्हणून,आम्ही कधी त्यासाठी वर्गातून आमची नावे दिलीच नाहीत.त्यामुळे नंतर होणार selecion तर लांबच. पण त्या मुलींची

,लीडरची परेड बघताना भारी वाटतयचः असंच एकदा आम्ही परेड बघायला मैदानावर गेलो होतो. आमच्या समोरून गाईड विभागाची परेड चालू होती. मी आणि माझी मैत्रिणी चाललो

होतो. आमच्या प्रत्येक वर्गाला बाहेरच्या बाजूने बाल्कनी होती. अशी सोसायटीतल्या ला असते तशी. आणि वगतल्या प्रतिनिधीला न विचारता Direct फिरायला बाहेर गेल्यामुळे ती बाहेर

बाल्कनी मध्ये आली.

आम्ही खाली मैदानावर परेड बघत होतो. आमच्या प्रतिनिधीने बाल्कनीमधून आवाज दिला, 'अर्पिता तुझ आणि तिचं म्हणजे (माझ्या मैत्रिणीच नाव) मी बाईंनाच सांगणार आहे.

अस ती मला बाल्कनीमधून म्हणाली, त्यावर मी तिला मोठ्याने 'अग एवढ काय झालं लगेच फक्त इथे खाली आलोय. 'अस मी मोठ्याने बोलल्यामुळे अचानक सगळे माझ्याकडे बघायला

लागले. आणि मला खूप वेगळ फील झाल. अचानक सगळे आपल्याकडे बघतात. तर, वेगळ वाटणारच ना! तेवढ्यात मला गाईड विभागाची परेड जी मुलगी घेत होती. तिने बोलावल.

मला वाटल की, मी मोठ्याने म्हणून यांना Disturb झाल. आणि त्यामुळे आता ही मला ओरडणार. मी तिला बोलले, sorry ताई परत नाही होणार असं, sorry तुम्हाला Disturb

झाल. ती म्हणाली, 'नाही, नाही तु इकडे ये. आता मला वाटल, 'आईशप्पथ! हो मला एखाद्या बाईंकडे घेऊन जाणार आणि माझी तक्रार करणार. मी तिच्याजवळ घाबरतच गेले. ती

म्हणाली, हे बघ मी इथे या मुलींची परेडची Practice घेते. ही लीडर आहे अस म्हणत तिने एका मुलीकडे बोट दाखवल. ती म्हणाली, 'सुरुवातीला ही जी Order देते ती ऐक एकदा

आणि तू मोठ्याने बोलून दाखव.' मला वाटल, 'ठीक आहे. एवढ काय त्यात'. त्या मुलीची Order ऐकल्यानंतर तीच Order मी मोठ्याने दिली. आणि ती मला म्हणाली, तुझा आवाज

मोठा आहे. तर आतापासून गाईड विभागाच्या परेड ची तू लीडर. आणि तिने त्या Order दिलेल्या आधीच्या लीडर ला काढून टाकल. आता २६ जानेवारीला गाईड विभागाची Final

निवड झालेली परेडची लीडर मी होते. खर तर, माझी अशी लीडरशीप करण्याची पाहिलीच वेळ होती. पण, ही. माझी इच्छा सुद्धा होती. कधीतरी आपल्याला झेंड्याला salute

ठोकायला मिळावा, आपण परेड मध्ये असाव. पण, तेव्हा एका छोट्या प्रसंगामुळे ही संधी मला मिळाली होती.

आता २६ जानेवारीचे दिवस जवळ येत होते. त्यामुळे मी दिवसभर गाईडच्या परेडची Practice करत करायचे. माझ्यासाठी ही गोष्ट खूप भारी होती. रोज शाळेत जायच,

हजेरी झाली की, दिवसभर Practice ला मैदानावर जायच हेच तेव्हा रोजच दैनंदिन झाल. पण, तेव्हा खूप थकायला व्हायचं. पण, आपण लीडरसाठी निवडलो गेलोय ही गोष्ट खूप

आनंद द्यायची शेवटी २६ जानेवारी हा दिवस आला. सगळ्यांनी चांगली Practice केली होती. कार्यक्रम सुरू झाला, थोड्याच वेळात परेड सुद्धा सुरू झाली. एक-एक परेड विभागाच्या

लीडर आपली ऑर्डर देऊन परेड सुरू करत होत्या. माझी पण वेळ आली. संपूर्ण मैदानावर शांतता आणि मी मोठ्याने ऑर्डर दिली आणि परेड सुरू झाली. त्यानंतर झेंड्यासमोर परत

ऑर्डर देऊन salute केला. त्याचवेळी उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांनी मला salute केला. नंतर सगळा कार्यक्रम चांगला पार पडला. पण, त्या दिवशी मी खूप आनंदात होते.

एका विभागाचा लीडर असून आपण स्वतः २६ जानेवारीसाठी ऑर्डर देण, परेड करण झेंड्यासमोर आणि सर्वांसमोर salute करण, सर्वांनी आपल्याकडे आदराने पाहण. या खूप

महत्त्वाच्या आणि आनंदाच्या गोष्टी होत्या माझ्यासाठी. त्यादिवशी मला माझा, शाळेचा, देशाचा खूप अभिमान वाटला. तो दिवस मला एक वेगळा अनुभव देऊन गेला. जवळजवळ पाच

हजार मुली आणि शिक्षकांसमोर आपण परेड करणार ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी होती, आनंदाची आणि अभिमानाची होती. म्हणून अजूनही २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या

दिवशी शाळेतल्या आठवणी ताज्या पुन्हा ताज्या होतात. अजूनही माझ्या शाळेत त्यावेळी जसा कार्यक्रम व्हायचा तसाच आजही होतो. खूप मुली त्या दिवशी कार्यक्रम बघायला पुन्हा

शाळेत जातात. आणि त्या मुलींमध्ये आपण आपले शाळेचे जुने दिवस शोधतो. तुम्ही सुद्धा कधीतरी या दिवशी आपल्या शाळेत जाऊन जुन्या आठवणींना उजाळा द्या,

 

पुढच पान लवकरच....