Malika.... Aayushyatlya Anubhvanchi - 5 in Marathi Short Stories by Arpita books and stories PDF | मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 5

The Author
Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 52

    નિતુ : ૫૨ (ધ ગેમ ઇજ ઓન)નિતુ અને કરુણા બંને મળેલા છે કે નહિ એ...

  • ભીતરમન - 57

    પૂજાની વાત સાંભળીને ત્યાં ઉપસ્થિત બધા જ લોકોએ તાળીઓના ગગડાટથ...

  • વિશ્વની ઉત્તમ પ્રેતકથાઓ

    બ્રિટનના એક ગ્રાઉન્ડમાં પ્રતિવર્ષ મૃત સૈનિકો પ્રેત રૂપે પ્રક...

  • ઈર્ષા

    ईर्ष्यी   घृणि  न  संतुष्टः  क्रोधिनो  नित्यशङ्कितः  | परभाग...

  • સિટાડેલ : હની બની

    સિટાડેલ : હની બની- રાકેશ ઠક્કર         નિર્દેશક રાજ એન્ડ ડિક...

Categories
Share

मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 5

पानं ५ 

 


       सगळ्यांची  Checking  झाली . पण , कोणाकडे काहीच नाही सापडलं .  त्यानंतर  मला  श्रद्धा  च्या  कपाटामध्ये  कापूस  ठेवलेला   एक  बॉक्स  सापडला .  त्या  बॉक्स  मध्ये

  सगळा  कापूस  ठेवला होता .  Checking करायच्या  वेळी  तो  बॉक्स  मी पहिला नव्हता .  जेव्हा मी तो बॉक्स उघडून पहिला तेव्हा , त्या बॉक्स मधल्या  कापसाच्या  खाली  माझी

 चावी होती . मला माझी चावी सापडली , पण इतका राग आला होता तिचा . मी ती चावी घेतली आणि तिच्याशी खूप भांडण केलं . तिचं डोकच कपाटावर जोरात आपटलं , खूप मारलं

 तिला मी . नळावरच्या बायका पाण्यासाठी जशा भांडतात तशी आमची भांडण झाली . काही  दिवसांनी ती भांडण पुन्हा मिटली सुद्धा .

 

       आम्ही पाचवीत असताना आमची ट्रिप पुण्यामधील लेकाफार्म इथे गेली होती . आता लिहिताना तिथे काय काय होतं ? हे एवढं आठवत नाही . पण , ८ सप्टेंबर ला गेली होती. लक्ष्मी

चा बर्थडे होता . तिचा बर्थडे पण तिथेच साजरा केला होता . खूप मज्जा आली होती , खूप खेळलो होतो तिथं आम्ही . शिंदेंची छत्री आणि आगाखान पॅलेस ला पण गेलो होतो . शिंदेंची

छत्री पाहायला गेल्यावर तर तिथे खूप चेरी ची झाडे होती . तेव्हा आम्ही तर कधी न मिळाल्यासारखी  चेरी खाल्ली होती . आणि आगाखान पॅलेस तर मला खूप आवडला मला . कारण , 

तिथे एक वेगळीच शांतता होती , खूप हवीहवीशी वाटणारी शांतता . त्या जागेची स्वछता आणि सगळ्या गोष्टींची जपणूक खूप चांगल्या पद्धतीने केली होती . आम्हाला हॉस्टेल मधून

बाहेर जायला परवानगी नव्हती . त्यामुळे कधी कधी रोजच्या  Routine ( दिनक्रम ) चा कंटाळा यायचा . मग असं कधीतरी बाहेर कुठे गेलो की , जरा वेगळचं वाटायच . पण , कधी

कधी  शनिवार - रविवार असला की , सुट्टीच्या निमित्ताने  आमच्या रेक्टर आम्हाला बाहेर फिरायला घेऊन जायच्या . केसरीवाडा , शनिवारवाडा , तुळशीबाग , दगडूशेठ गणपती

 अस जाणं व्हायच . एकदा असचं केसरीवाड्यात गेलो होतो तेव्हा आम्हाला टिळकांचा आवाज ऐकवला होता .

 

        अचानक बाहेरची दुनिया पहिली की , भारी वाटायचं . बाहेरच्या लोकांसाठी ते जग त्यांच्या जगण्यासाठीची  एक पद्धत होती , त्यांच्या जगण्याचा एक भाग होता . पण , आम्ही 

कधीतरी हे सगळं बघत असल्यामुळे आमचा त्या जगाशी आलेला  तात्पुरता संबंध आमची पुढचे खूप काही दिवस  करमणूक करायचा . जेव्हा आम्ही कुठे बाहेर नाही जायचो तेव्हा ,

आम्ही रूम मध्ये आमच्या डबलबेड ला  blanket ( चादर ) बांधायचो आणि घर-घर खेळायचो . ब्युटी पार्लर , दुकान , दवाखाना असं खेळायचो . ब्युटी पार्लर मध्ये सगळ्यांच

मेकअप च सामान ठेवायचो आणि कागदाचे पैसे देऊन आम्हीच ते पुन्हा विकत घ्यायचो . दुकानामध्ये पण आमचा खाऊ ठेवायचो आणि परत तोच विकत घ्यायचो . आणि जेव्हा

दवाखाना खेळायचो तेव्हा तर जाम मज्जा यायची . कोणीतरी डॉक्टर - नर्स बनायचं , कोणीतरी  पेशंट आणि त्याचे  नातेवाईक बनायचं . एकाचं मेडिकल पण असायच . डॉक्टरांच

सगळं सामान , खोट्या गोळ्या-औषधं , सलाईन असं सगळ तयार केलेलं असायचं . कधी ऑपेरेशन सुद्धा व्हायचं . आता जरी हे सगळं आठवल तरी वाटत ,आपण खरंच हे खेळायचो.

पण , तेव्हा या सगळ्या खेळांची मज्जा काही वेगळीच असायची . शाळेमध्ये - हॉस्टेलमध्ये आमचे दिवस असेच चालले होते . या सगळ्यामध्ये वार्षिक परीक्षा संपून उन्हाळ्याची सुट्टी कधी

लागली , हे कळालंच नाही . आणि आता आम्ही सहावीत गेलो .

 

      मी सहावीत असतानाची गोष्ट आहे . आम्हाला सकाळी लवकर शाळा असल्यामुळे जेवणच करून शाळेत जायचो . आणि मधल्या सुट्टीत नाश्ता असायचा . एक दिवस नाश्त्याला

ढोकळा होता . मला मेस मधला ढोकळा अजिबात आवडत नव्हता . मी आणि माझ्या मैत्रिणी मेसमध्ये नाश्ता करायला गेलो . तेव्हा समजलं की , आज नाश्त्याला ढोकळा आहे . आणि

मेसमध्ये रेक्टर असायच्या . त्यामुळे , परत बाहेर पण येता यायचं नाही . आणि एकदा डिश मध्ये नाश्ता घेतला की , तो सगळा संपवावा लागायचा . आता मी नाईलाजाने ढोकळा घेतला

होता . पण , आता संपवायचा कसा ? मला तर ढोकळा अजिबात आवडत नव्हता . मैत्रिणींना सुद्धा नव्हता आवडत . तरीही , त्या कसतरी खायच्या . पण , मी खरचं नव्हते खाऊ

शकत. सगळ्या मुलींनी आपापला नाश्ता संपवला . सगळ्या मुलींचा नाश्ता होऊन मेस रिकामी होत आली . तरीही मी एक घास सुद्धा खाल्ला नव्हता. मला त्या ढोकळ्याच्या वासानेच

कसतरी व्हायचं . पण , हा ढोकळा खायचा तरं , नाही मग आता याच काय करायचं ? आणि टाकून कसा द्यायचा ? असा विचार मी करत होते . तेवढ्यात माझ्या खिशामध्ये मला रुमाल

सापडला . त्या रुमालामध्ये अक्षरशः मी ढोकळा भरला , रुमालाची गाठ मारली . आणि पटकन मेस च्या बाहेर आले . आणि रुमाल कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकला . खरंतर , अस करणं

चुकीच आहे . पण , मला तेव्हा तेच सुचल होतं . या सगळ्यात माझी त्या ढोकळ्यापासून सुटका झाली होती . त्यामुळे मात्र , मला खूप आनंद झाला होता .

 

पुढचं पान लवकरच.....