Malika.... Aayushyatlya Anubhvanchi - 3 in Marathi Short Stories by Arpita books and stories PDF | मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 3

The Author
Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 52

    નિતુ : ૫૨ (ધ ગેમ ઇજ ઓન)નિતુ અને કરુણા બંને મળેલા છે કે નહિ એ...

  • ભીતરમન - 57

    પૂજાની વાત સાંભળીને ત્યાં ઉપસ્થિત બધા જ લોકોએ તાળીઓના ગગડાટથ...

  • વિશ્વની ઉત્તમ પ્રેતકથાઓ

    બ્રિટનના એક ગ્રાઉન્ડમાં પ્રતિવર્ષ મૃત સૈનિકો પ્રેત રૂપે પ્રક...

  • ઈર્ષા

    ईर्ष्यी   घृणि  न  संतुष्टः  क्रोधिनो  नित्यशङ्कितः  | परभाग...

  • સિટાડેલ : હની બની

    સિટાડેલ : હની બની- રાકેશ ઠક્કર         નિર્દેશક રાજ એન્ડ ડિક...

Categories
Share

मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 3

 

पानं  ३

 

         मला तर आता काय करू सुचत नव्हतं . खूप रडायला येत  होत . आता हे लिहिताना काय वाटत नाहीये . पण , तेव्हा माझ्यावर आलेल मोठं संकट वाटलं होत. धनश्री 

   (माझी मैत्रीण) मला म्हणाली , मी थांबते इथेच तू लगेच घेऊन ये चष्मा . मी लगेच जाऊन चष्मा घेऊन आले . मग आम्ही नेमून दिलेल्या वर्गात बसलो . म्हणजे आमच्या

   Admission च्या पावतीवर क्लास आणि Division दिलेली होती . धनश्री आणि मी एकाच वर्गात होतो . तेव्हा आमचं सेमीच च ऍडमिशन झालं नव्हतं. आम्ही दोघी  एकत्र बसलो .

 

      नंतर  आमची  एक  नवीन  मैत्रीण झाली , लक्ष्मी . ती सेमीची Exam द्यायला आली होती , त्या दिवशी . पण , आमची त्या दिवशी Exam झालीच नाही , दुसऱ्या दिवशी झाली .

खरं म्हणजे , मला सेमी ला ऍडमिशन नकोच होत . म्हणून , मला ती सेमीची Exam पण द्यायची नव्हती . मी पहिली ते चौथी मराठी माध्यमातून शिकले होते .त्यामुळे मला जर गणित

आणि शास्त्र English मधून आलं नाही तर , म्हणून मला खूप भीती वाटायची . त्यामुळे, मी या Exam मध्ये Fail व्हायचं ठरवलं . का काय माहित ? पण मी हे ठरवलं होत .

 

     मला आठवतयं , त्या  दिवशी  आमचा  Result  लागणार  होता . Result  लागण्याआधी  शाळा  भरल्यावर  लक्ष्मी  माझ्या  आणि धनश्री च्या शेजारी बसली . पण , नेहमी

सारखी ती बोलत नव्हती . मी तिला विचारलं काय झालं ? ती काहीच  बोलली नाही . पण , तिचे डोळे पाण्याने अगदी गच्च भरून आले होते . तिच्या डोळ्यातल्या पाण्याने मला शांत

केलं होत . माझ्यात तिला पुन्हा तोच प्रश्न विचारायची हिम्मत होत नव्हती. इतक्यात तिच्या अश्रूंचा बांध फुटला आणि तिनेच सांगितलं , ' माझी आई गेली , मला फार आठवण येतेय

तिची '.  हे ऐकल्यावर धनश्री माझ्याकडे पाहत होती . आता मी यावर तिला कसं समजावणार होते ? तेवढ्यात आमच्या Exam चा Result लागला . माझी तर इच्छाच नव्हती दुसऱ्या

वर्गात जाण्याची . मला माझ्या मैत्रिणींनी खूप समजवल . पण या Exam वरून मी सारखी रडत असायचे . तेव्हा ढेकणे बाई या आमच्या वर्गशिक्षिका होत्या. आम्ही ५ वी ड या मराठी

माध्यमाच्या वर्गात बसायचो . त्या दिवशी आमच्या बाईंनी Result वाचायला सुरुवात केली . एका एका मुलीच नाव लिस्ट मध्ये येत होत . मला तरं सेमी माध्यमाच्या वर्गात जायचं

नव्हतं. त्यामुळे,  आपलं नाव या लिस्ट मध्ये असू नये . हीच माझी इच्छा होती . पण , झालं उलटचं माझं नाव त्या लिस्ट मध्ये आलंच . मग आम्हाला लगेचच दुसऱ्या वर्गात जायला

सांगितलं . लक्ष्मी आणि धनश्री पण माझ्यासोबत होत्या . मग आम्ही दुसऱ्या वर्गात गेलो . मलगुंडे बाईंनी आमची हजेरी घेतली . आता त्या आमच्या नवीन वर्गशिक्षिका होत्या . आणि

माझा ५ वी चा पहिला होता वर्ग इयत्ता ५ वी ६ . तेव्हा ६ , ५ , ४ हे अंक तुकडी (Division) साठी होते . नंतर पुढे त्या ऐवजी अ , ब , क अशा तुकड्या (Division) झाल्या . शेवटी

माझा सेमी च्या वर्गाचा प्रवास सुरु झालाच .

 

    सकाळी लवकर उठणं , आवरणं आणि मग नाश्ता , क्लास , शाळेची तयारी , जेवण , शाळा , मधल्या सुट्टीचा नाश्ता , शाळेतून आल्यावर Fresh होणं , नाश्ता करणं मग

प्रार्थनेला  जाणं , रात्रीच जेवणं , सुट्टीच्या दिवशी T.V पाहायचा आणि भरपूर झोपायचं . सुट्टीच्या दिवशी जेवण करून दुपारी झोपणे हे Hostel मध्ये एखाद्या सणासारखं साजरं केलं

जात . म्हणजे आमच्या हॉस्टेल मध्ये शनिवार आणि रविवार हे दोन्ही दिवस दुपारच्या वेळी कोणत्याही रूम मध्ये पाहिलं तरी तुम्हाला सगळे झोपले  हे दिसणारच . खिडक्यांना बेडशीट

लावून अंधार करणे , दार लावणे , Fan चा Speed Full करणे आणि मग काय  ? मस्त ताणून देणे . असेच आमचे शाळेचे दिवस बऱ्यापैकी चालले होते .

 

 

 

     पुढच पानं लवकरच.....