Malika Aayushyalya Anubhvanchi - 14 in Marathi Short Stories by Arpita books and stories PDF | मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 14

The Author
Featured Books
Categories
Share

मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 14

पान १४

 

        ऐका ना ! आमच्या शाळेत खूप वेगवेगळ्या स्पर्धा असायच्या. म्हणजे मी असा कधीच भाग घेतला नव्हता. पण वर्गात जेव्हा बाई मराठीच्या कविता शिकवायच्या. तेव्हा शिकवून

झाल्यावर उभं राहून सर्वांना म्हणायला सांगायच्या. कोणालाही उठवून त्या कवितेला चाल म्हणजे एका वेगळ्या गाण्याचा ठेका लावून कविता म्हणायला सांगायच्या. याने कविता एका

वेगळ्या पद्धतीने म्हणली जायची, मजा यायची आणि ती कविता लक्षात पण राहायची. मी सुद्धा बाईंनी शिकवलेल्या कविता चाल लावायचे. त्यामुळे, बाईच्या बऱ्यापैकी लक्षात होते.

आणि अजूनही आहे. आमच्या मराठी विषयाच्या बाईच नाव नाईक बाई. खूप प्रेमळ आणि चांगला स्वभाव. बाई आम्हाला Hostel च्या मुलींना जास्त जीव लावायच्या. कारण, आम्हाला

आमच्या आईची आठवण येऊ नये. बाई म्हणायच्या, 'तुम्हाला काही वाटल तर, माझ्याकडे यायच'. कधीकधी बाई आमच्यासाठी घरचा डबा आणायच्या. खरच, तेव्हा त्या आम्हाला

आईसारख्या होत्या. होत्या नाही आजही तेवढ्याच मायेने आमची विचारपूस करतात. तर, एकदा असचं बाईचा मराठीचा तास वर्गात चालू होता. आणि शाळेमध्ये मराठी कवितांची स्पर्धा

होती. म्हणजे आम्हांला काही कल्पना नव्हती. आमच्या शाळेत मुलींना काही सूचना सांगायच्या असतील किंवा वर्गासाठी काही असेल, किंवा परीक्षा वेळापत्रक,सुट्टी, सहल, उपक्रम

अशा काही सूचना असतील तर, प्रत्येक वर्गात मामा किंवा मावशी व सूचना सूचनावही घेऊन यायचे. असाच एक दिवस मराठीचा तास चालू असताना मावशी सूचनावही घेऊन वर्गात

आल्या.

       'श्रावणधारा' नावाची स्पर्धा होती. म्हणजे स्वतः तयार केलेल्या मराठी कवितांची स्पर्धा. मावशींनी सूचना वाचून दाखवली. आणि म्हणाल्या 'कोणाला नाव दयायची आहेत का? या

स्पर्धेसाठी". वर्गात पूर्ण शांतता ! मग आमच्या बाई म्हणाल्या, 'अरे ! कोणाला नाव दयायची आहेत का ?' तरीही कोणी काहीच बोलल नाही. कोणीच प्रतिसाद न दिल्यामुळे वर्गांच्या

बाहेर मावशी जाणार तेवढ्यात आमच्या बाई म्हणाल्या, 'मावशी ! आर्पिता च नाव लिहा.' हे ऐकून मी तर शांत एकदम ! सगळा वर्ग माझ्याकडे बघत होता. आणि मला तर पुढे काय

बोलू हेच कळत नव्हत. बाई म्हणाल्या, 'आर्पिता घेईल भाग तिच नाव लिहा तुम्ही'. मावशींनी मला पुढे बोलवून माझ नाव स्पर्धेसाठी लिहून घेतलं. त्या नंतर काही वेळाने मराठीचा तास

संपला. दरवाजातून बाहेर जाताना बाईंनी मला नंतर स्टाफरूम मध्ये येऊन भेट, अस खुणवलं.

       नंतर शाळा सुटल्यावर मी बाईना भेटण्यासाठी गेले. बाई म्हणाल्या, 'अगं तू एवढ्या छान चाली लावतेस कवितेला. तर सुचेल तुला कविता एखादी. तू करशील माहितीये मला.

म्हणून, तुझ नाव दिल मी.' यावर मी फक्त हो बाई बोलून मान डोलावली. आता मला बाईनी हे स्टाफरूम मध्ये बोलावून सांगितल्यामुळे तिथे बसलेल्या काही शिक्षकांना सुध्दा मी

या स्पर्धेत भाग घेतला आहे हे समजल होत. मला तर प्रश्नच पडला होता. काय करू मी ? रूमवर गेले. आवरल वगैरे आणि थोडा विचार केला. मग वाटत की, नाही जमणार जाऊ दे.

उद्या बाईशी बोलेन, आणि सांगेन त्यांना. दुसऱ्या दिवशी बाईना सांगितल की, 'बाई मला नाही जमणार कविता वगैरे तयार करायला.' बाई बोलल्या. 'आर्पिता तू प्रयत्न तर कर, जमेल

तुला. पण, मी अजून एक कारण दिल बाईना. की, बाई आम्हांला Hostel च्या बाहेर जायची परवानगी नाही. आणि स्पर्धा तर बाहेर आहेत. तर त्यावर बाई म्हणाल्या, 'अग मी बोलेन.

तुमच्या रेक्टर बाईसोबत त्या नेतील तुम्हांला. 'आता यावर मी काय बोलणार ? मान डोलावून आले फक्त. पण आता कविता वगैरे कशी तयार करू ? हाच विचार करून तो पण दिवस

गेला. रात्री जेवण झाल्यावर वाटलं, करू प्रयत्न. कदाचित जमेल आपल्याला. मग वही-पेन घेऊन रूमच्या बाहेर आले. आणि एका कोपऱ्यात शांतपणे लिहित होते, तेवढ्यात साक्षीआणि

आरती आल्या.

       'काय करतीये ?' साक्षी म्हणाली. मी तिला बोलले की, 'अग ! मला बाईनी कवितेच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला सांगितला आहे. अजून कोणी घेतलाय का भाग ?' त्या नाही बोलल्या

'ऐका की, माझ्यासोबत तुम्ही पण घ्या ना या स्पर्धेत भाग' मी त्यांना म्हणाले. साक्षी म्हणाली, 'अग हे कविता वगैरे नाही जमत ग'. त्यावर मी म्हणाले, 'पण मी तुम्हांला कविता करून

देते. तुम्ही फक्त माझ्यासोबत स्पर्धेत भाग घ्या. आणि मी केलेली कविता फक्त तिथे म्हणा. एवढचा ! तर त्या दोघी तयार झाल्या. त्यानंतर मी आमच्या तिघींसाठी कविता तयार केल्या.

दुसऱ्या दिवशी जाऊन बाईना माझ्यासोबत साक्षी आणि आरती सुद्धा स्पर्धेत आहेत. म्हणून, नाव दिली. आता स्पर्धेसाठी २-३ दिवसच राहिले होते. पण, मी अशी काही खास तयारी

केली नव्हती. तिथे जाऊन आपली कविता म्हणून दाखवायची. एवढंच डोक्यात ठेवलं. तरीही टेन्शन होतंच. सुट्‌टीच्या दिवशी स्पर्धा होती. रविवारी सकाळी लवकर आवरून आम्ही

बाईच्या ऑफीस मध्ये त्यांची वाट बघत होतो. थोड्या वेळात बाई पण आल्या. आम्हांला त्या स्पर्धेसाठी घेऊन जाणार होत्या. आम्ही चाललो तर होतो. पण, मला तर खूप टेन्शन आल

होत. कारण, मी कधीच कोणत्या स्पर्धेमध्ये भाग घेतला नव्हता. माझ्या आयुष्यातली मी भाग घेतलेली ही पहिलीच स्पर्धा.

        सकाळी अकरा च्या दरम्यान पोहोचलो होतो आम्ही. गेल्यावर सगळ्या मुलांना एका ओळीत बसवत होते ते. आम्ही पण बसलो. पण, स्पर्धा खूप वेळ असल्यामुळे आमच्या बाई

आम्हाला सोडून परत गेल्या. त्या म्हणाल्या, 'स्पर्धा संपण्याआधी - निकाल लागण्याआधी मी येईन'. पुण्यातील सर्व शाळांमधल्या मुलांच्या कवितांची खूप मोठी स्पर्धा होती. खूप

मुलांनी भाग घेतला होता. आता स्पर्धा सुरू झाली. पण, कविता सर्वांसमोर सादर करायची नव्हती सगळे लेखक, कवी म्हणजे ५-६ जण समोर बसले होते. आणि त्यांच्यासमोर एक -

एक विद्यार्थी जाऊन कविता सादर करणार, अस होत. मुली - मुलांचा लहान गट आणि मोठा गट असे विभाग होते. एक एक जण जाऊन सर्वासमोर कविता सादर करत

होते. पण,सगळ्यांनी खूप जोरदार तयारी केली होती. त्यांची Practice पाहून मला टेन्शन आल. 'काय बोलतील आपल्या कवितेला' एक-एक जण समोर जात होते. काही वेळाने

माझाही नंबर आला. समोर गेले पहिल्यांदा थोडी भीती वाटली. पण सगळा धीर एकवटून कशीतरी मी कविता चालीत म्हणून दाखवली, माझ्यानंतर मग आरती आणि साक्षीचा

पण नंबर झाला. सर्वांच सादरीकरण झाल्यावर जेवणाची सुट्टी झाली. आणि त्यानंतर निकाल होता. मेसमधून बटाट्याची भाजी आणि चपाती डब्यात आणली होती. जेवण केल.

आणि आता निकाल लागणार होता.

       स्टेजवर सगळे लेखक, कवी बसले होते. आधी मुलांचा लहान गट आणि मोठा गट यांची विजेती नाव घोषित केली. मला तर माहित होते की, आपला काय नंबर वगैरे येणार

नाहीये, कोणाला बक्षीस मिळणार तेवढं फक्त बघायच. आता मुलींची नाव घेण्यासाठी सुरुवात झाली. पण, आधी मोठा गट मग लहान गट. तेवढ्यात उत्तेजनार्थ मध्ये आरतीय नाव

घेतले. आणि आरती प्रमाण पत्र घ्यायला पुढे गेली. तिस‌रा क्रमांक गेला. आता दुसरा क्रमांक मध्ये साक्षीच नाव घेतलं. साक्षी पण प्रमाणपत्र घेऊन आली. मला वाटलं, 'आपण यांना

कविता तयार करून दिली. आणि आपल्यालाच बक्षीस नाही मिळाल. नंतर वाटलं, जाऊ दे ! आपल्याला मिळालं नसल तरी कविता तर आपलीच होती. असा मी विचार केला.

      आणि तेवढ्यात प्रथम क्रमांक म्हणून माझं नाव घोषित झाल. मी तर जागेवरच शांत, मला काहीच कळत नव्हत. म्हणजे विश्वासच बसत नव्हता. माझे हात-पाय थंड पडले होते.

थरथर कापत होते. पुन्हा एका नाव घेतलं गेलं. मुलीच्या लहान गटातून प्रथम क्रमांक आर्पिता, शाळा- हुजूरपागा. आरती आणि साक्षीने मला हातावर मारले. "अग! उठ जा ना तुझंच

नाव घेतलंय". त्यांनी मला सांगितल्यावर मी भानावर आले. पुढे जाऊन बक्षीस घेतलं. गळ्यात शाल, हातात प्रमाणपत्र, यशवंतराव चव्हाण यांच्या आत्मचरित्राच पुस्तक आणि जोरदार

टाळ्यांचा कडकडाटाने सगळा हॉल भरून गेला होता. फक्त निशब्द होते मी तेव्हा. खूप आनंद झाला होता मला. डोळ्यातून आनंदाश्रू येत होते. बक्षीस घेऊन जागेवर बसले. खूप

रडायला आल होते. नंतर स्पर्धा संपली. बाईसुध्दा  निकाल्याच्या वेळेस आल्या होत्या. त्यामुळे आम्हांला तिघींनाही बक्षीस मिळाल आहे. हे त्यांनी पाहिल होत. कदाचित माझ्या पेक्षा

जास्त आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता. कारण, त्यांचा माझ्यावरचा विश्वास खरा ठरला होता.

    त्यानंतर Hostel वर पण सर्वांना सांगितले. दुसऱ्या दिवशी शाळेत सुद्धा माईक वरून आमची नावे घेऊन अभिनंदन केल. त्यामुळे सगळ्या शाळेला माहित झाल होते. आम्हांला

बक्षीस मिळाल आहे. त्या दिवशी बक्षीस मिळाल्यावर मला तर सगळ जिंकल्याचा आनंद झाला होता.कारण, मी केलेल्या सगळ्या कवितांना बक्षीस मिळालं होतं. आता नाव जरी

मैत्रिणीच असलं तरी त्या कविता तर माझ्याच होत्या. हे माझ मी सहावीत असतानाच पहिलं बक्षीस. पण, त्यामागे आमच्या नाईक बाईनी माझ्यावर दाखवलेला विश्वास होता. त्यानंतर

आम्ही आठवीत वगैरे असेन. तेव्हा माझ्या घरी असंच मराठी साहित्य संमेलनाच मासिक आलं होत. आणि त्या स्पर्धेत आम्ही त्यात आमची नाव होती. म्हणजे आम्ही ती स्पर्धा जिंकल्याची

नाव होती त्यात. ते पान आजही मी जपून ठेवले आहे. कारण, ते माझ्या आयुष्यातलं मला मिळालेलं पाहिले बक्षीस होत. आणि मला खरंच, चांगली कविता करता येते. व मला कळाल.

 

पुढच पान लवकरच...