Totaya - 11 - last part in Marathi Thriller by Abhay Bapat books and stories PDF | तोतया - प्रकरण 11 (शेवटचे)

Featured Books
Categories
Share

तोतया - प्रकरण 11 (शेवटचे)

चंद्रहास चक्रपाणी च्या  पुस्तकातील शेवटचे प्रकरण.........11.

पळून जातांना चक्रपाणीला त्याच्या मूळ  वेषातच  बाहेर जावे लागणार होते, त्याच्याच गाडीने.पण त्याला बाहेर जायचे स्वातंत्र्य देण्यात आल्यामुळे पहारेकरी  अडवणार नव्हते.तसंच घडलं. दुबईच्या विमान तळाच्या दिशेने चंद्रहास  चक्रपाणीने गाडी पिटाळली........ 
गाडीच्या वेगाने मनातले विचार पळत होते.खऱ्या प्रजापतीला भेटायची संधी त्याला मिळालीच नाही.त्याला त्याच्या दुष्ट आईने, प्रशिला ने खरंच खोलीत जखडून ठेवला होता आणि चंद्रहास ला भासवल होतं की त्या खोलीत मालविका असते म्हणून. प्रजापती हृदय विकाराचा झटका येऊन मेल्याचं समीप ला योगायोगानेच ,क्रॉस फोन कनेक्शन मुळे समजलं. पण तो  दोन वर्षापासून खरंच आजारी असल्याचा दाखला मालविका ने चंद्रहास ला  दिला होता  म्हणून त्या वरून  प्रशिलाचा खोटेपणा उघड तरी झाला होता. क्षय सदृश्य कुठल्या तरी रोगाने ते क्षीण होत असल्याचा उल्लेख त्या दाखल्यात होता. मालविका म्हणाली होती की तिला त्याच्या खोलीतून पायांचे आवाज येतात, ते खरंच होतं.अर्थात चंद्रहासला सुद्धा त्या खोलीत जायची संधी होती पण प्रशिला चा शेरू आल्यामुळे तो घाबरून पळाला होता.मालविकाला सुद्धा त्या दुष्ट प्रशिला ने तिच्या ड्रायव्हर करवी मारलं होत.ही खुनाची मालिका आपण तोडायचीच असा निश्चय चंद्रहास ने केला.विमानतळ जवळ आलं.
गाडी तिथल्याच पार्किंग मधे सोडून द्यायची आणि भारतात पळून जायचा विचार चंद्रहास ने केला. . 
काहीही करून आपण त्यांच्या तावडीत सापडायचे नाही असं चंद्रहास ने ठरवलं.पटापट विचार करायला लागला. त्यांना चकवा द्यायचा तर ते काय विचार करतील, याचा अंदाज  बांधणं आवश्यक होतं.  विमान तळावर गाडी पार्क केली तर ती शोधणे त्यांना सहज शक्य होणार होतं.मग  त्यांच्या लक्षात येणार होतं की साधारण कधी गाडी सोडली असेल आणि तिथून त्या वेळेला भारतात जाणाऱ्या विमानाची प्रवाश्यांची यादी बघून ते सहज आपल्याला शोधून  काढू शकतील.त्यामुळे त्याने  ठरवलं, गाडी विमान तळावर पार्क करायची पण विमानाने कुठेच जायचं नाही. भारतातही नाही आणि दुसरीकडे कुठेच नाही.राहायचं दुबई मधेच. त्याच्या कडे प्रजापतीचा पासपोर्ट आणि व्हिसा असल्याने इथे राहण्यात अडचण नव्हती.त्यांना अजिबात वाटणार नाही की तो दुबईतच राहील. तो लगेच भारतात जाईल असाच अंदाज ते करतील. विमानतळाला लागून असलेल्या हायवेवर असंख्य हॉटेल्स होती. चंद्रहास ने तसंच केलं.गाडी विमान तळावर पार्क केली.सर्वात प्रथम चंद्रहास ने बँकेतून काही पैसे काढले.रोखीने एक मोबाइल खरेदी केला.पुढे मागे बँक व्यवहारासाठी तो उपयोगी पडणार होता.नंतर टॅक्सी केली. 
“मला हायवेवरचं जवळचं हॉटेल दाखव एखादं.” त्याने टॅक्सी ड्रायव्हरला सांगितलं.  डेल्मन नावाच्या  हॉटेलात ड्रायव्हर घेऊन आला.तिथे टॅक्सी सोडली. टॅक्सी चे पैसे दिले.  ड्रायव्हर टॅक्सी वळवून घेई  पर्यंत त्याच्या  समोरच  त्या हॉटेल च्या रिसेप्शन च्या दिशेने तो चालत गेला, टॅक्सी दूर गेल्याची खात्री केल्यावर डेल्मन हॉटेल मधे न जाता तो तिथून अर्धा किलोमीटर लांब असलेल्या हॉटेल ‘ओझोन’ मधे चालत गेला.. त्याचा शोध घ्यायला ते लोक आले तर त्यांना चकवा बसला असता.  त्याने जरा स्वस्तातलं हॉटेल निवडलं होतं..जिथे ओळख पत्र बघतील पण फार तपशीलात तपासणार नाहीत  असं हे हॉटेल होतं. काउंटर वर मुलगी होती. त्याने आपला स्वत:चा  पासपोर्ट  दाखवला, तिने त्याची झेरोक्स काढली रजिस्टर काढलं, त्यावर त्याला नाव लिहायला सांगितलं.चंद्रहास ने ते नाव टोनी ग्रेग असं मुद्दाम लिहिलं.त्याला बघायचं होतं की हे नाव ती मुलगी पासपोर्ट वरच्या नावाशी ताडून बघते का.पण तसं काहीच झालं नाही.केवळ एक औपचारिकता म्हणून तिने माझं आय.डी. तपासलं. दोन तीन दिवस राहायचं आहे म्हणून तीन दिवसांचे पैसे  काउंटर वर भरले. खोलीत जाऊन आराम केला.अति श्रमामुळे कधी झोप लागली त्याला कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी  सकाळी उठला .खोलीच्या दाराच्या फटीतून त्या दिवशीचे  वर्तमान पत्र टाकलं होतं. ते  पाहिलं.त्यात प्रजापती च्या मृत्यूची बातमी आलेली नव्हती.  त्याला हायसं वाटलं.त्याने थोडावेळ पेपर चाळला.तेवढ्यात आतल्या पानावर आलेल्या एका छोट्या बातमीने त्याच्या हृदयाचा ठोका चुकवला. 
‘बॉलीवूड मधील ज्युनियर अॅक्टर समीप सिन्नरकर चा स्विमिंग टँक मधे पोहताना बुडून मृत्यू.’  अशी ती बातमी होती. दुबई ते मुंबई विमानाने प्रवास केल्या नंतर सिन्नरकर मुंबईत पोचले आणि ग्लो स्टार हॉटेलात उतरले होते. त्या हॉटेलातल्या स्विमिंग पुलात पोहताना, अति दमल्यामुळे हृदय बंद पडून  त्यांचा मृत्यू झाला होता  अशी बातमी होती.  
अखेर या लोकांनी त्यांचा डाव साधलाच.पळून गेल्या पासून काही तासातच  त्याला त्यांनी संपवला. चक्रपाणीच्या मनात आलं.  भारतात लगेच परतण्याची सिन्नरकर ची चूक झाली होती.ती त्याला भोवली होती.पोहताना नैसर्गिक मृत्यू दाखवून त्यांनी त्याला बरोब्बर संपवले होते.  आपण इथेच राहिलो आणि काळजी घेऊन या हॉटेलात आलो हे बरं झालं असं चक्रपाणीच्या मनात आलं. आता तीन दिवस इथेच थांबणं धोकादायक होतं.त्याने हॉटेल सोडायचा निर्णय घेतला. तो   खाली आला.कालची मुलगी  काउंटरवर नव्हती. वेगळाच पुरुष होता.त्याला तेच हवं होतं.तो पुन्हा रूम मधे आला. बॅग मधून प्रजापतीचा मास्क काढला आणि चढवला, बॅग घेऊन खाली आला  आणि सरळ बाहेर पडला. पुन्हा चकवा. आत येताना चंद्रहास चक्रपाणी च्या  वर्णनाचा माणूस आत आला होता.त्याने  टोनी ग्रेग नावाने रजिस्ट्रेशन केलं होतं.तो आला तेव्हा रिसेप्शानिस्ट मुलगी होती. तो तीन दिवस राहणार म्हणाला  होता. बाहेर पडणारा माणूस प्रजापती च्या वर्णनाचा होता. रिसेप्शानिस्ट बदलला  होता. आणि तीन दिवसा ऐवजी दुसऱ्याच दिवशी बाहेर पडला होता.  आता त्याचा माग काढणे त्यांना  अवघड जाणार होतं. त्याने तिथून बाहेर पडल्यावर टॅक्सी केली, त्याला एका होटेलचं नाव आणि पत्ता सांगितला. तिथे उतरून  टॅक्सीच्या ड्रायव्हर ला आधीच्याच पद्धतीने फसवलं म्हणजे  चालत दुसऱ्याच ‘कपल’ नावाच्या  हॉटेल मधे गेला. तिथे प्रजापती चा पासपोर्ट दाखवून  वेगळ्या नावाने बुकिंग केलं. म्हणजे रजिस्टर वर वेगळंच नाव टाकल.तिथेही ते पासपोर्टशी ते नाव  तपासलं गेलं नाही. दोन तीन दिवसांचे भाडे अॅडव्हान्स दिलं पण प्रत्यक्षात दुसऱ्याच दिवशी निघाला..थोडक्यात ओझोन हॉटेल मधे त्याने जी कार्यपद्धती वापरली होती, ज्याला पोलिसी भाषेत मोडस ओपेरंडी म्हणतात, तीच   कपल हॉटेलात वापरली. अशा पद्धतीने  पुढच्या दहा  दिवसात दहा हॉटेल्स  त्याने बदलली.प्रत्येक हॉटेल सोडताना  वेगवेगळ्या देशात जाण्यासाठी विमान तळावर चाललोय असं मुद्दाम रिसेप्शनिस्ट ला सांगत असे.  आत जातांना तो प्रजापती च्या वेषात गेला तर बाहेर पडताना चक्रपाणीच्या वेषात  असे.तर कधी उलट करत असे.  आता त्याला खात्री पटली होती की त्यांना गुंगारा देण्यात आपण यशस्वी झालोय. कारण आठवडा भर प्रजापती कंपनीची कोणतीच बातमी  पेपरात आली नव्हती.
पण हे किती दिवस चालणार होतं? केव्हातरी त्याला  भारतात यावंच लागणार होतं.त्याने आणखी एक खेळी खेळायचं ठरवलं.आठव्या दिवशी त्याने दुबई ते भारत असं विमानाचं तिकीट बुक केलं.  पण त्याच्या आदल्या दिवशीच तो दुबई वरून मेट्रो आणि बस चा वापर करून  शारजा मधे आला आणि तिथून त्याने भारतात जाणाऱ्या विमानाचं तिकीट बुक केलं. हे विमान त्याला मुंबईत घेऊन गेलं.प्रजापती कंपनीच्या लोकांनी त्याचा दुबई ते भारत विमानाने कोणी गेलं का याचा शोध घेतला असता तर त्यांना तिथे कोणीच आलं नाही सीट रिकामी होती अशी माहिती मिळाली असती,आणि  तो पर्यंत  शारजा मधून चंद्रहास  भारतात  पोचला आहे  हे त्यांच्या लक्षातही आलं नसतं.
आता चंद्रहासला पैशांची चणचण भासू लागली.बँकेतले पैसे संपत आले होते.भारतात सुरक्षित राहायचं आणि त्याच वेळी पोटा पाण्याची सोय कायमची करायची यासाठी त्याने आणखी एक डाव टाकायचं ठरवलं. विमान तळावर उतरल्यावर तो मुंबईत न राहता एका बस ने  प्रथम तो नागपूर मधे आला.तिथे अपेक्स बँकेचं रिजनल ऑफिस होतं.ही बँक म्हणजे प्रजापती कंपनीच्या स्पर्धक उद्योगपतीच्या म्हणजे मिरचंदानी एम्पायर्स ग्रुपच्या मालकीची होती.मुद्दाम चंद्रहासने याच बँकेची निवड केली. 
“ मला तुमच्याकडे खातं उघडायचं आहे. ”  रिजनल मॅनेजर समोर बसत आपली ओळख करून देत  चंद्रहास म्हणाला.
“ थँक्स, पण हे रिजनल ऑफिस आहे, तुम्हाला याच इमारतीत तळ मजल्यावर असलेल्या  शाखेत जावं लागेल.” रिजनल मॅनेजर म्हणाला.
“  मला कल्पना आहे याची , मी तिथे जाईनच पण मला माझ्या मृत्यू पत्राचं व्यवस्थापन करायचं असेल तर त्यासाठी तुमचा एखादा विभाग आहे का ते सांगाल का? नेमकं कुणाला भेटू मी?”
“ त्याच माणसाच्या समोर तुम्ही बसलाय ! ” रिजनल मॅनेजर हसून म्हणाला.
“ ओह ! माझ्या मनात एक कल्पना आहे, त्या नुसार तुम्ही व्यवस्थापन करू शकणार असाल तर मी तुम्ही सांगाल त्याच्या दुप्पट व्यवस्थापन फी तुम्हाला देईन शिवाय मी सडा फटिंग असल्यामुळे म्हणजे मला कोणीही नातलग नसल्याने  माझ्या मृत्यू नंतर  माझ्या खात्यात जेवढी रक्कम जमा असेल ती सर्व मी तुमच्या बँकेला दान म्हणून देईन.”
“  किती रक्कम असणार आहे ती?” मॅनेजर ने विचारलं.
“ हे बघा, रोज माझ्या खात्याला पाच लाख रक्कम जमा होणार आहे.मगाशी  मी म्हंटल्या प्रमाणे मी सडा फटिंग असल्याने आणि पुढेही तसाच राहणार असल्याने  खर्च करून-करून मी किती करणार रोज? अगदी एखादा बंगला घेतला तरी  महिन्या भरात माझ्याकडे कोटीभर रुपये साचतील.रोज पाच लाख च्या हिशोबाने  पुढे जमा होणाऱ्या रकमेचं काय?” 
त्याला कसला तरी संशय आला असावा आणि ते स्वाभाविक होतं.
“ असा कुठला व्यवसाय आहे तुमचा की रोज पाच लाख जमा होणार आहेत तुमच्या खात्यात? तुम्हाला माहिती आहे की हल्ली खात्यात जमा होणाऱ्या रकमेची खातरजमा आणि विश्वासार्हता  बँकेला तपासावी लागते. आणि...” रिजनल मॅनेजर म्हणाला.
“ त्याची काळजी करू नका.ही रक्कम माझा पगार म्हणून जमा होणार आहे.त्यावर मी इन्कम टॅक्स ही भरणार आहे.” चंद्रहास म्हणाला.
“ मग हरकत नाही.” मॅनेजर म्हणाला.  “ तरीही केवळ एक उत्सुकता म्हणून विचारतो एवढा पगार तुम्हाला मिळणार आणि तो ही रोजच्या रोज, तुम्ही नेमके कुठल्या विषयातले तज्ज्ञ आहात?”
“ माझ्याकडे बरीच माहिती आहे, म्हणजे हल्लीच्या भाषेत ‘डेटा बेस’. ज्याचा उपयोग मला पगार देणाऱ्या कंपनीला होणार आहे. आणि पगार रोज द्यावा ही माझी अट आहे. जी त्या कंपनीने मान्य केली आहे.” चंद्रहास म्हणाला.
“ ठीक आहे. ” मॅनेजर म्हणाला. “ आमचे बँक म्हणून जे नियम आहेत ते तुम्ही पूर्ण करणार असाल तर आमची हरकत नाही.” रिजनल मॅनेजर म्हणाला.
“  मी एका  गोपनीय पत्राच्या  सहा प्रती  सहा पाकिटात बंद करून तुमच्याकडे देणार आहे. माझ्या पश्चात तुम्ही  त्यातील एक पाकीट मिरचंदानी ग्रुप च्या अध्यक्षांना द्यायचे आहे. तुमची बँक मिरचंदानी  ग्रुप अंतर्गत येते, मला माहीत आहे.  दुसरे पाकीट  आपल्या गृह मंत्रालयाला द्यायचे आहे. तिसरे पाकीट भारतातील  अबुधाबी  दूतावासाला, चवथे  अबुधाबी मधील भारतीय दूतावासाला द्यायचे आहे.पाचवे  भारतातील   दुबईच्या  दूतावासाला  द्यायचे आहे. आणि सहावे दुबईतील भारतीय दूतावासाला .”
“ हे पत्र  तुमच्या मृत्युपत्राच्या व्यवस्थापनाचा भाग असणार आहे?” मॅनेजर ने विचारलं.  
“ हो. तुमच्या वैयक्तिक माहितीसाठी सांगतो, की  या पाकिटातल्या मजकुरामुळे,तुमचा  मिरचंदानी ग्रुप त्यांच्या स्पर्धक कंपनीला पूर्ण नेस्तनाबूत करू शकणार आहे.”   मी तुम्हाला अत्ता देत असलेली माहिती, मी देणार असलेले पत्र,  माझ्या खात्याला जमा होणाऱ्या रकमा, आपली ही भेट हे सर्व  पूर्ण पणे गुप्त ठेवाल का?”
“ हे सांगायची गरज नाही.बँकेचे हे कर्तव्यच असतं. ”
“ कदाचित तुमच्या ग्रुप च्या स्पर्धक कंपन्यांचे काही लोक माझी माहिती काढायला येऊ शकतात .” चंद्रहास म्हणाला.
“ कोणीही येवो. माहिती गोपनीयच राहील.” त्याने खात्री दिली.
“ रोज जमा होणाऱ्या पाच लाखातून  एक हजार रुपये तुमच्या मृत्यूपत्र व्यवस्थापनाच्या फी पोटी जमा करून घ्या अशी सूचना लिहून ठेवा माझ्या वतीने.” चंद्रहास म्हणाला.
“त्याची गरज नाही. ती महिन्यातून एकदा घेण्याची पद्धत आहे.”
“ तुमच्या खात्याला रोज जमा होणाऱ्या रकमेचं तुम्ही काय करणार? म्हणजे कुठे गुंतवायची आहे ती? रिकरिंग किंवा  विमा?” मॅनेजरने विचारलं.
“ काही नाही.ते तिथेच राहू दे. त्या निमित्ताने तुम्हाला बिन व्याजी रक्कम वापरायला मिळेल.” चंद्रहास चक्रपाणी म्हणाला.
“ बिन व्याजी नाही, कमी व्याजाने.” मॅनेजरने दुरुस्ती केली.
दोघेही हसले.
“  आता एक महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा.” चंद्रहास म्हणाला.  “ खरं म्हणजे हा प्रश्न तुम्ही विचारायला हवा होता. ”
“ काय?” मॅनेजरने गोंधळून विचारलं.
“ माझ्या पश्चात जी सहा पत्रे तुम्ही देणार आहात, ती कधी द्यायची हे तुम्हाला कसं कळणार?”
“ तुमच्या मृत्यू नंतर अर्थात.” मॅनेजर म्हणाला.
“ पण मी मेलो हे तुम्हाला कळवायला येणार कोण? मला कोणी  नाही ” चंद्रहासने विचारलं.
मॅनेजरने याचा विचार केला.पण त्याला पटकन काही सुचलं नाही.
“ ज्या दिवशी माझ्या खात्यात पाच लाख जमा होणार नाहीत त्या दिवशी माझा मृत्यू झालाय असे गृहीत धरून तुम्ही ही  पत्र पाठवायची कारवाई करा.” चंद्रहास म्हणाला. 
“ ठीक आहे.” मॅनेजर म्हणाला.
“पण  पाच लाख जमा होतात की नाही यावर तुम्ही  रोजच्या रोज लक्ष कसं ठेवणार?” चंद्रहासने विचारलं.
“ मी कॉम्प्युटर मधे  तुमच्या खात्यात अशी सूचना देऊ शकतो की ज्या  एखाद्या दिवशी रक्कम जमा होणार नाही त्या दिवशी दिवस संपताना शाखा जेव्हा आपला सर्व व्यवहार रिजन ला पाठवते, त्यावेळी म्हणजे डे-एंड अॅक्टिव्हिटी च्या वेळी, ते काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला  कॉम्प्युटर वर मेसेज दिसेल. आणि तो तसं मला कळवेल.” मॅनेजर म्हणाला.
“ हे एकदम छान होईल.” चंद्रहास खुष झाला.  “ तुमच्या जागी बदलून दुसरा कोणी आला तरी ही पद्धत चालू राहील ना?”
“ अर्थात.बँक-व्यवहार नियंत्रण ही माणसं करत नाहीत, सिस्टीम करते. ” 
चंद्रहास खुष होऊन उठणार तेवढ्यात चहा आला. चहा पिता पिता चंद्रहासच्या एकदम मनात आलं, पाच लाख खात्यात जमा झाले नाहीत तर हा मॅनेजर आपण दिलेली  सहा  पत्रे संबंधिताना पाठवेल आणि त्यातून प्रजापती कंपनीचं मोठं स्कँडल बाहेर येईल हे बरोबर, पण समजा त्या लोकांनी आपल्याला शोधून काढलं, आणि ठार केलं, पण बँकेकडून संबंधिताना पत्रे पाठवली जाऊ नयेत म्हणून ते रोज पाच लाख आपल्या खात्यात भरत राहिले तर? बँकेची अशी समजूत होईल की मी जिवंत आहे कारण रोज पाच लाख जमा होत आहेत, त्यामुळे पत्रे पाठवण्याची गरज नाही. 
काहीतरी वेगळी युक्ती करायला हवी.आपले गुपित बाहेर न येण्यासाठी आपल्याला ठार केल्यानंतर सुद्धा  हे लोक रोज पाच लाख खर्च करतील. 
दोघांचा चहा घेऊन झाला तरी चंद्रहास बसून राहिला.
“ काही प्रॉब्लेम आहे? शंका आहे?” मॅनेजर ने विचारलं.
“ एकच बदल करु या,” चंद्रहास म्हणाला.
“ बोला.” मॅनेजर म्हणाला.
“ पाच लाख जमा झाले नाहीत तर तुम्ही ठरल्या प्रमाणे पत्र पाठवायची या ऐवजी, ज्या दिवशी खात्यातून रक्कम काढली जाणार नाही, मग ती कितीही असो, त्या दिवशी माझा मृत्यू झाला असे गृहीत धरून ती पत्रे पाठवावीत.” चंद्रहास म्हणाला.
“ याचा अर्थ रोज तुम्ही थोडीफार रक्कम काढणारच.आणि जेव्हा काढणार नाही तेव्हा तुम्ही हयात नाही असं बँकेने समजावं, असंच म्हणायचं आहे ना तुम्हाला?” मॅनेजर म्हणाला.
“ अगदी बरोबर.म्हणजे मी रोज रोख रक्कम काढेन असं नाही, कधी चेक ने काढीन, कधी दुसऱ्या बँकेत ट्रान्स्फर करेन पण डेबिट एन्ट्री करीनच.  आणि ती कितीही रकमेची करेन, आणि ती ज्या दिवशी होणार नाही त्या दिवशी तुम्ही पत्रे द्यायची.” चंद्रहास म्हणाला.  “तुमच्या कडे ऑन लाईन व्यवहाराची  ची सोय असेल ना?  ”
“ तुम्ही नि:शंक रहा. खालच्या मजल्यावर जाऊन खाते उघडा, त्याचा नंबर मला द्या, तुम्हाला ज्या काही सूचना द्यायच्या आहेत, आपल्यात अत्ता झालेल्या चर्चे नुसार त्या लेखी स्वरुपात मला द्या. तेच तुमचे मृत्युपत्र आहे  असा उल्लेख त्यात करा, आणि आम्ही  तशी कारवाई करू. ”
त्याला शेक हँड करून चंद्रहास उठला.
“ माय गुडनेस, एवढा वेळ आपण बोलतोय पण तुमचं नाव विचारलंच नाही मी.” चंद्रहास म्हणाला.
“ प्रीतांश मिरचंदानी.”
***
बँकेतून बाहेर पडल्यावर  चंद्रहास चक्रपाणीने जवळच्या स्टेशनरी च्या दुकानातून काही कोरे कागद, आठ दहा एन्व्हलप, आणि इतर किरकोळ खरेदी केली.जवळच्या पोस्ट ऑफिसातून  पोस्टाची तिकिटे आणली  आणि  जवळच्या एका निवांत कॉफी शॉप मधे गेला. एक टेबल पकडून  कॉफीची आणि टोस्ट ची ऑर्डर दिली आणि लिखाणाच्या लिखाणाच्या तयारीला लागला.
भारतीय गृह खाते, दुबई, अबुधाबी येथील भारतीय दूतावास आणि  भारतातील त्यांच्या  देशाचा दूतावास यांना उद्देशून लिहायची पत्रे लिहायला घेतली.सर्व पत्रांचा मजकूर  सारखाच होता.
“हे पत्र आपल्या हाती पडेल त्यावेळी पत्र लिहिणारा मी या जगात नसेन.माझ्या मृत्युपत्राचे व्यवस्थापन मी अपेक्स बँकेला दिले असून माझ्या इच्छेनुसार माझ्या मृत्यू नंतर त्या बँके मार्फत हे पत्र आपणाकडे पाठवण्यात आले आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी आपल्या सरकारने प्रजापती कॉर्पोरेशन शी एक मोठा करार करून त्यांना खूप मोठे काम दिले आहे. कराराच्या वेळी कंपनीचा मालक प्रखर प्रजापती ने कराराच्या वेळी स्वत: हजर राहून सह्या कराव्यात  ही महत्वाची अट  होती.या दोन्ही अटींची पूर्तता त्यात झालेली नाही आणि यात आपल्या सरकारची यात मोठी फसवणूक झाली आहे. या बाबत माझ्याकडे पुरावे आहेत.  प्रखर प्रजापती चा तोतया म्हणून मलाच तिथे नेण्यात आलं होतं.मीच त्याच्या सह्या केल्या आहेत आणि माझ्या बरोबर समीप सिन्नरकर हा देखील अबुधाबी मधील व्यवहारांसाठी तोतया म्हणून हजर होता. आम्हाला दोघांनाही गुंगीचे औषध देऊन पळवण्यात आलं होतं आणि बंदिवासात ठेऊन सक्तीने दुबईला नेऊन आमच्या कडून हे काम करून घेण्यात आलं होतं.बॉलीवूड मधे निर्मात्यांना छोट्या मोठ्या कामांसाठी अभिनेते पुरवणारा प्रीतम कपूर नावाचा मध्यस्त आहे त्याचेकडे हा भालेकर आला होता.व प्रीतम कपूरनेच माझे नाव सुचवल्यावर मला प्राशिला गुंगीचे औषध देऊन मला पळवले होते. सर्वात महत्वाचा पुरावा म्हणजे स्वत: प्रखर प्रजापती हा करार करण्याच्या तारखेला मरणासन्न अवस्थेत दुबई येथे त्याच्या बंगल्यात होता आणि करार करण्यापूर्वी एक वर्षं पासून  तो अशाच अवस्थेत  होता.त्याचे वैयक्तिक खाते ज्या दुबई इंटरनॅशनल बँकेत आणि स्टेट बँकेच्या फोर्ट शाखेत आहे, त्या दोन्ही  खात्याच्या रेकॉर्ड ला तुम्हाला डॉक्टरांचा दाखला  पुरावा म्हणून  मिळेल की गेली दोन वर्षे  प्रजापती हा शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अपंग झाला असून तो कधीच बरा होवू शकत नाही. तो बँक व्यवहारासाठी सक्षम नाही.. या आधारावरच त्याचे खाते वापरासाठी पॉवर ऑफ अॅटॉर्नी दिली होती.असे असताना  तो समक्ष हजर राहून  आपल्या सरकारशी हे करार कसे करू शकला?  याची चौकशी व्हावी. या पत्रा सोबत मी डॉक्टरांचा दाखला   आणि पॉवर ऑफ अॅटॉर्नी ची प्रत जोडली आहे 
प्रखर प्रजापती चा आता  मृत्यू झाला असून तो सुद्धा त्याची आई प्राशिला आणि तिचा साथीदार भालेकर यांनी दडवून ठेवला आहे. आपण याची सखोल चौकशी करून हे सर्व व्यवहार रद्द ठरवावेत, कंपनीला व या फसवणुकीत सहभागी असलेले   भालेकर व प्राशिला यांना शिक्षा करावी.माझे नशीब म्हणून मी त्यावेळी  त्यांच्या तावडीतून निसटून बाहेर पडलो परंतु आता त्यांनी मला शोधून काढून ठार केले आहे. हे केव्हातरी घडणार हे मला माहित होते म्हणून मी आधीच माझ्या मृत्युपत्रात  तुम्हाला हे गुपित कळवण्याची व्यवस्था केली होती.”
खाली चंद्रहास चक्रपाणी ने सही केली आणि डॉक्टरांचा दाखला आणि पॉवर ऑफ अॅटॉर्नी ची प्रत स्टेपल केली. 
बाहेर जाऊन दोन्हीच्या सात-सात प्रति काढल्या आणि पाकिटात बंद करून पाकीट सील केलं. पाकिटावर  ते कुणा-कुणाला पाठवायचं त्यांची नावे  लिहिली.पोस्टाची तिकिटे लावली.
आता दुसरा टप्पा, मृत्युपत्र. 
“ मी खाली सही करणार, चंद्रहास चक्रपाणी वय पस्तीस राहणार.... पूर्ण शुद्धीत आणि उत्तम मानसिक अवस्थेत असून आज दिनांक .... रोजी  माझे खालील प्रमाणे  इच्छापत्र करत आहे...  आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार त्याने अपेक्स बँकेला दिले आहेत ” चंद्रहास लिहू लागला.
या नंतर चंद्रहास चक्रपाणी ने रिजनल मॅनेजर बरोबर झालेल्या चर्चेचे अनुषंगाने त्यात नमूद केलं की  त्याला कोणीही वारस नसल्याने मृत्यूच्या दिवशी  त्याच्या अपेक्स बँकेतील खात्यात जमा असणारी सर्व रक्कम ही त्याच्या मृत्यू पश्चात बँकेला बक्षीस म्हणून द्यावी.त्याच्या मृत्यूची बातमी पुराव्यानिशी त्याच्या बँकेला कोणी दिली नाही तर त्याच्या  बँकेच्या खात्यात ज्या दिवशी कोणतीही नावे रक्कम पडणार नाही त्या दिवशी चंद्रहास चक्रपाणी चा मृत्यू झाला असे  बँकेने गृहीत धरावे आणि   या मृत्युपत्राची अंमलबजावणी  करावी. त्याने त्यात हे ही नमूद केलं की या मृत्युपत्रासोबत त्याने एकूण सहा पत्रे पाकिटात सील बंद करून बँक व्यवस्थापनाकडे दिली आहेत. मृत्यू नंतर  एक पाकीट मिरचंदानी ग्रुप च्या अध्यक्षांना द्यायचे आहे. दुसरे पाकीट  आपल्या गृह मंत्रालयाला द्यायचे आहे. तिसरे पाकीट भारतातील  अबुधाबी  दूतावासाला, चवथे  अबुधाबी मधील भारतीय दूतावासाला द्यायचे आहे.पाचवे  भारतातील  दुबईच्या  दूतावासाला  द्यायचे आहे. आणि सहावे दुबईतील भारतीय दूतावासाला.
असे मृत्युपत्र तयार झाल्यावर त्याने  त्याची झेरॉक्स प्रत काढली. मूळ पत्र पाकिटात बंद केलं.त्यावर बँकेचे नाव लिहिलं. 
आता तिसरा टप्पा, जो सर्वात महत्वाचा,
चंद्रहासने आणखी कॉफी आणि टोस्ट ब्रेड ची ऑर्डर दिली.
हे तिसरे पत्र त्याने भालेकर, प्राशिलाt आणि प्रजापती कंपनीला उद्देशून लिहायला सुरुवात केली......
“ हे पत्र तुम्हाला मिळेल त्यावेळी मला कलकत्याच्या पोलिसांकडून कायम स्वरूपी संरक्षण मिळालेले असेल.कारण मला तुमच्या कडून कशा प्रकारचा धोका आहे हे त्यांना सांगितल्यावर त्यांनी मला हे संरक्षण देऊ केले आहे.
दुबई आणि अबुधाबी सरकारशी प्रजापती कंपनीने केलेले करार  हे फसवणुकीचे असल्याचे पुरावे माझ्याकडे असून मी ते  खाली नमूद केलेल्या  व्यक्ती किंवा संस्थांना पाठवण्यासाठी तयार ठेवले आहेत. १. तुमची स्पर्धक  मिरचंदानी ग्रुप च्या अध्यक्षांना
२. केंद्रीय गृह मंत्री यांचे कार्यालय. 
३. भारतातील  अबुधाबी आणि दुबईच्या दूतावासाला
४. अबुधाबी आणि दुबई मधील भारतीय दूतावासाला.
माझ्या मृत्यू नंतर ही पत्रे वरील सर्वांना पाठवली जातील अशी व्यवस्था  मृत्यू पत्राचे व्यवस्थापन करणाऱ्या तुमच्या स्पर्धक मिरचंदानी ग्रुपची  एक बँक   माझ्या वतीने करणार आहे.
मला गुंगीचे औषध देऊन कसे पळवण्यात आले, मी तुमच्या  साठी तोतया म्हणून कसा वावरलो, सह्या कशा केल्या तेथ पासून मी तुमच्या तावडीतून कसा निसटलो याचे अॅफिडेव्हीट मी या पत्राला जोडले आहे. हे सर्व चंद्रहास चक्रपाणी ने केले  आमचा त्याच्याशी संबंध नाही अशी भूमिका  तुम्ही घेऊ शकता.ते होऊ नये म्हणून प्रखर प्रजापती हा गेली दोन वर्षे  मरणासन्न अवस्थेत अंथरुणाला खिळला असताना  अबुधाबी व दुबई सरकारशी करार करण्यासाठी समक्ष हजर कसा राहू शकतो हा सवाल मी उपस्थित केला असून स्टेट बँक आणि दुबई इंटरनॅशनल बँकेत, प्रजापती दोन वर्षे  मरणासन्न  आजारी असल्याचा  जो डॉक्टरांचा दाखला  दिला आहे त्याची प्रत मी पुरावा म्हणून  सादर केली आहे.  मालविका ने  तो मला एका बेसावध क्षणी दिला आहे. मुळात तुमची या सर्वाला संमती असल्या शिवाय आणि तुम्ही मला तुमच्या बरोबर दुबईला आणल्या शिवाय मला एकट्याला हे सर्व करणे शक्य नव्हते आणि त्यात माझा काही हेतू असू शकत नव्हता  हे न ओळखण्या जोगे आपले गृह खाते आणि दूतावास मूर्ख नाही.शिवाय तुमची सर्वात मोठी स्पर्धक, मिरचंदानी कंपनीच्या अध्यक्षांना  जेव्हा हे पत्र मिळेल तेव्हा ते  तुम्हाला संपवण्यासाठी सरकार कडे किती पाठपुरावा  करतील याचा विचार करा.
या सर्वाची परिणीती काय होईल ते पहा. तुम्ही केलेले सर्व करार रद्द होतील. त्याची प्रचंड मोठी नुकसान भरपाई तुम्हाला अबुधाबी आणि दुबई सरकार ला द्यावी लागेल. आंतरराष्ट्रीय कोर्टात तुमच्या कंपनी विरुद्ध दावे लावले जातील. वैयक्तिक भालेकर आणि प्राशिला वर मोठा गुन्हा नोंदवला जाईल.राष्ट्र द्रोहाचा.
हे सर्व टाळायचे असेल तर मला जिवंत ठेवणे हा तुमच्या समोर एकमेव पर्याय आहे. आणि जिवंत राहण्यासाठी मला रोज पाच लाख लागणार आहेत.तेव्हा  तुम्ही रोज माझ्या  अपेक्स बँकेच्या खात्याला  पाच लाख एवढी रक्कम जमा करत राहायचे आहे.  मी  जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत यातील कोणतीही पत्रे कोणालाही जाणार नाहीत कारण तसे मी माझ्या बँकेला कळवले आहे.  कारण तुमच्या बदनामीपेक्षा मला पैशात रस आहे.ज्या दिवशी पाच लाख जमा होणार नाहीत त्या दिवशी वरील सर्वांना पत्रे पाठवायची सूचना मी बँकेला दिली आहे. आता मला ठार करून सुद्धा रोज बँकेत पाच लाख भरून ही पत्रे जाणार नाहीत असा डाव तुम्ही साधू शकता म्हणून मी बँकेला  अशी सूचना दिली आहे की मी रोज बँकेतून काहीतरी रक्कम काढत जाईनच. ज्या दिवशी काढणार नाही त्या दिवशी ही सर्व पत्रे संबंधितांना जातील. पाच लाख जमा केल्यावर सुद्धा पत्रे पाठवली जातील अशी काळजी तुम्हाला वाटत असेल तर ती सोडून द्या कारण पत्रे पाठवली जाताच तुम्ही पाच लाख पाठवणे बंद करू शकता पण  मला रोज पाच लाख हवे आहेत , पत्र पाठवायला जेवधे जास्तीत जास्त दिवस जातील तेवढे जास्त पैसे मला मिळतील त्यामुळे जो पर्यंत मला पैसे मिळत आहेत तो पर्यंत पत्रे जाणार नाहीत.सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहात तुम्ही मी मारून कशाला टाकू ती?
तेव्हा  माझ्या खात्यात  आज पासून पुढे पाचव्या दिवशी पहिला पाच लाखाचा हप्ता जमा होईल आणि पुढे रोज जमा होतील अशी व्यवस्था करा.तसे झाले नाही तर सरकार , मिरचंदानी हे तुमच्या वर तुटून पडण्यापूर्वी मी माझ्या एका पत्रकार मित्राला या  पत्रांची प्रत देऊन तुमच्या मागे ससेमिरा लावू शकतो हे ध्यानात ठेवा. टेलीव्हीजन्स ची सर्व चॅनेल्स, सर्व वर्तमान पत्रे रोज तुम्ही केलेल्या फसवणुकीच्या बातम्या दाखवतील. 
तुम्ही सूज्ञ आहात. अधिक खुलासा करायची गरज नाही.” 
पत्राखाली चंद्रहास ने सही केली.  त्याचा तीन झेरॉक्स काढल्या. एका पाकिटात  ती पत्रे टाकली.त्यावर भालेकर, प्राशिला आणि प्रजापती कंपनीचा पत्ता लिहिला, त्यावर पोस्टाची तिकिटे लावली.नंतर ती  तिन्ही पत्रे एका मोठ्या पाकिटात भरली.त्यावर पोस्ट मास्तर कलकत्ता जी.पी.ओ. असा पत्ता लिहिला आणि एक चिट्ठी लिहिली की या पाकिटातील तिन्ही पत्रे त्यावर लिहिलेल्या पत्त्यावर पाठवावीत. एवढे केल्यावर चंद्रहास ने ते मोठं पाकीट पोस्टाच्या पेटीत टाकल.
आता या मोठ्या पाकिटातील पत्रे  पोस्ट मास्तर कलकत्ता जी.पी.ओ. कडे पोचल्या नंतर त्यावर ‘पाठवणारे’ पोस्ट ऑफिस म्हणून कलकत्त्याच्या पोस्टाचा शिक्का पडणार होता.त्यामुळे भालेकर, प्राशिला यांची अशीच समजूत होणार होती की ज्या अर्थी पत्रावर कलकत्त्याच्या पोस्टाचा शिक्का  आहे त्या अर्थी चंद्रहास कलकत्त्यातच आहे. त्या लोकांना एक चकवा दिला जाणार होता. पुढच्या आठवड्यात भालेकर, प्राशिला यांना हे पत्र पोचणार होतं. त्यापुढे दोन दिवसात माझ्या खात्यात रक्कम जमा होणार होती.
नक्कीच.
सहा पत्रे लिहिलेली सहा पाकिटे आणि मृत्यू पत्राचं एक पाकीट  घेऊन चंद्रहास चक्रपाणी बँकेत  पोचला.  बँकेच्या इमारतीत  खालच्या मजल्यावर जाऊन खाते उघडण्याचे सोपस्कार पूर्ण करून  रिजनल मॅनेजर मिरचंदानी याला भेटला. आपल्या खात्याचा तपशील याला दिला.  आपल्या बरोबर आणलेली सहा पाकिटे आणि मृत्युपत्र मिरचंदानी कडे देऊन त्याची पोच घेतली. आणि बँकेच्या बाहेर पडला.
त्या नंतरचा आठवडा त्याने वेगवेगळ्या गावात  फिरण्यात घालवला.....



.....बरोब्बर दहा दिवसांनी मिरचंदानीने  आपल्या टेबल वरचा फोन रिंग वाजल्यामुळे उचलला.
“ ओह येस, मिस्टर चक्रपाणी ! मी तुम्हाला फोन करणारच होतो पण तुमचा मोबाइल रेंज मधे नव्हता. तुम्हाला गुड न्यूज आहे, तुमच्या खात्याला पाच लाख रक्कम जमा झाली आहे.” 
समाप्त.